cold wave sakal
अकोला

अकोला : थंडीची लाट ओसरली; किमान तापमानात वाढ

नागरिकांना अंशतः दिलासा; हवामानात बदल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : आठवड्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील नागरिकांना कडाकाच्या थंडीचा सामना करावा लागला. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन सुद्धा प्रभावित झाले होते. परंतु आता थंडीची लाट ओसरली आहे. त्यासोबतच किमान तापमानात सुद्धा वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांना अंशतः दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गत काही दिवस जिल्ह्याच्या किमान तापमानात वेगाने घट झाली होती. विदर्भ, उत्तर महाराष्ट्रासह, मराठवाड्यात किमान तापमान ११ अंश सेल्सियसच्या खाली आले होते. दरम्यान आता उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट ओसरल्यानंतर राज्यातही गारठा कमी झाला आहे. दिवसाच्या कमाल तापमानात चढ-उतार सुरूच आहे. परंतु किमान तापमानात वाढ झाल्याने जिल्ह्यातून थंडी काही प्रमाणात गायब झाल्याचे दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांना कडाक्याच्या थंडीपासून अंशतः दिलासा मिळाल्याचे दिसून येत आहे. उत्तरेकडी राज्यांमध्ये बर्फवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यात २०, २१ व २२ डिसेंबर रोजी थंडीचा जोर सर्वाधिक होता. त्यामुळे महानगरात दिवसभर वातावरणात गारठा जाणवत होता, रात्री कडाक्याच्या थंडीने जनजीवन प्रभावित झाले होते. परंतु २३ डिसेंबरपासून मात्र थंडीचा जोर कमी झाला. त्यामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

मंगळवारपासून पावसाची शक्यता

राज्याच्या किमान तापमात वाढ होण्याची शक्यता असल्याने थंडी आणखी कमी होण्याचे संकेत आहेत, तर बंगालच्या उपसागरावरून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पावसाला पोषक हवामान होणार असल्याने मंगळवार (ता. २८) पासून जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात हवामानात आणखी बदल दिसून येऊ शकते.

तापमानावर दृष्टीक्षेप

  • तारीख - किमान - कमान

  • १८ डिसेंबर - १४.६ - २९.३

  • १९ डिसेंबर - १४.७ - २८.०

  • २० डिसेंबर - ११.३ - २७.२

  • २१ डिसेंबर - ११.० - २९.०

  • २२ डिसेंबर - ११.३ - ३१.५

  • २३ डिसेंबर - १२.४ - ३२.५

  • २४ डिसेंबर - १३.८ - ३१.७

  • २५ डिसेंबर - १५.१ - ३०.८

  • २६ डिसेंबर -१४.६ - ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

IND vs AFG: १५ वर्षांच्या वैभव सूर्यंवशीसमोर बुमराहचा यॉर्कर अन् बाऊन्सरचा मारा! सरावावेळी नेमकं काय घडलं?

Civic Body Clash: स्वच्छता साहित्य डीबीटीने देणे अशक्य; महापालिका प्रशासनाचा फेरप्रस्ताव, स्थायी समितीशी संघर्षाची शक्यता

नितीन गडकरींना मुंबईतील वाहतूक कोंडीचा फटका; नियोजित कार्यक्रमात पोहोचण्यास तासभर उशीर; म्हणाले, जुन्या उड्डाणपुलांऐवजी...

ENG vs PAK, Test: इंग्लंडचा पाकिस्तानला व्हाईटवॉश! बर्मिंगहॅम कसोटीतील विजयानंतर WTC Points Table मध्येही मोठे बदल

SCROLL FOR NEXT