Congress ,BJP  sakal
अकोला

अकोला : काँग्रेस भाजपला मराठा कार्डने आव्हान देणार!

विद्यमान आमदारांच्या विरोधात काँग्रेसची उमेदवारीसाठी डॉ. ढोणेंचे नाव चर्चेत

सकाळ वृत्तसेवा

अकोला : विधान परिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. त्यासाठी भाजपचे विद्यमान आमदार डॉ. रणजित पाटील यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांच्या विरोधात काँग्रेस मराठा कार्ड वापरण्याची शक्यता आहे. त्यासाठी अकोला येथील काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. सुढीर ढोणे यांचे नाव चर्चेत आहे.

अकोला, बुलडाणा आणि वाशीमसह अमरावती विभागातील पाच जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या अमरावती विभागीय पदवीधर मतादरसंघाची सध्या मतदार नोंदणी जोमाने सुरू आहे. त्यासाठी विद्यमान आमदार डॉ. पाटील व काँग्रेसतर्फे डॉ. ढोणे यांनी प्रयत्न चालविले आहे. सोबतच युवा नेते शरद झाबरे यांनी पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे यावेळी होणाऱ्या निवडणुकीत चांगलीच सुरूस राहण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉ. पाटील यांनी १२ वर्षांपूर्वी ज्येष्ठ आमदार बी.टी. देशमुख यांचा पराभव करून विजय मिळविला होता. त्यांनी सलग दोन वेळा हा मतदारसंघ कायम राखण्यात यश मिळविले. गतवेळीही त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आव्हान दिले होते. यावेळी पुन्हा एकदा काँग्रेसने डॉ. पाटील यांच्या विरोधात ओबीसी-मराठा उमेदवार रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे.

मुंबईतील बैठकीत झाली चर्चा

पदवीधर मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मंगळवारी मुंबई येथे बैठक झाली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झालेल्या या बैठकीत उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली. मात्र, अद्याप उमेदवाराचे नावावर अंतिम निर्णय झाला नाही.

डॉ. ढोणेंचे नाव आघाडीवर

शिक्षणक्षेत्रासोबत राजकारणात गेले अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले डॉ. सुधार ढोणे यांनी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्याची इच्छा जाहीर केली होती. त्यांच्या नावावरही मुंबईतील बैठकीत चर्चा झाली. अकोल्यातून या मतदारसंघासाठी काँग्रेसतर्फे डॉ. ढोणे एकमेव आघाडीवर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd T20I: २० चेंडूंत ५ विकेट्स! वैभव सूर्यवंशी बघा कसा OUT झाला! इंग्लंडने सापळा रचून करेक्ट कार्यक्रम केला.. Video

Argentina vs Egypt: थरार, थरार, थरार... मेस्सीची पेनल्टी हुकली तरीही अर्जेंटिनाने पिछाडीवरून मुसंडी मारली; १३ मिनिटांत मॅच फिरवली

IND vs ENG 3rd T20I: फिल सॉल्टची तुफान फटकेबाजी, इंग्लंडचे भारतासमोर तगडे लक्ष्य... प्रिंस यादव, हर्षित राणा चमकले पण...

FDA Raid : दूग्ध प्रक्रिया उद्योगावर FDAचा छापा; भेसळयुक्त दूध केले जप्त

America-Iran War: होर्मुजच्या सामुद्रधुनीत पुन्हा तणाव! २४ तासांत तीन तेल जहाजांवर हल्ले

SCROLL FOR NEXT