akola
akola sakal
अकोला

अकोला : मनपा कर्मचाऱ्यांकडून मालमत्तेची ३४ लाखांची वसुली

सकाळ वृत्तसेवा

अकोला : महानगरपालिकेचा २०३ कोटी रुपयांच्या लक्ष्यांकापैकी १२७ कोटी रुपये मालमत्ता कर थकीत आहे. मात्र, महानगरपालिकेच्या दिव्याखालीच अंधार असून, मनपाचे कर्मचारीच थकबाकीदार आहे. या थकबाकीदार कर्मचाऱ्यांच्या वेतनातून बुधवारी तब्बल ३४ लाखांची वसुली करण्यात आली आहे.

अकोला महानगरपालिकेच्या उत्पन्नाच्या मुख्य स्रोतापैकी मालमत्ता कर वसुली हा सर्वात मोठा स्त्रोत आहे. मनपाचा प्रशासकीय खर्च व मनपा निधीतून करावयाची विकास कामे या निधीवरच अवलंबून असतात. त्यामुळे मनपाकडून नागरिकांना वारंवार थकीत मालमत्ता कर भरण्यासंदर्भात आवाहन केले जाते. गत काही महिन्यांपासून थकित मालमत्ता कराच्या वसुलीबाबत मोहीम राबविली जात आहे. सामान्य नागरिकांसोबत बड्या थकबाकीदारांवर सिलची कारवाई केली जात आहे. मात्र, ज्या कर्मचाऱ्यांचे वेतन या मालमत्ता करातून होते, त्या कर्मचाऱ्यांनीच मालमत्ता कराचा भरणा गेले कित्तेक वर्षांपासून केला नसल्याचे उघडकीस आल्याने यापूर्वीच्या आयुक्त नीमा अरोरा यांनी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून मालमत्ता कराची वसुली करण्याचा आदेश दिला होता.त्यानुसार बुधवारी मनपा कर्मचाऱ्यांचे वेतन झाल्यानंतर वेतनातून लाखो रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे.

अशी झाली वसुली

महानगरपालिकेच्या वर्ग तीन व चारच्या १२८ कर्मचाऱ्यांच्या वेतनातून १२ लाख ८५ हजारांचा मालमत्ता कर वसुल करण्यात आला आहे. याशिवाय १८७ सफाई कर्मचाऱ्यांकडून २१ लाख ८१ हजार रुपायंची वसुलीही वेतनातून करण्यात आली आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांकडे लाखोंची थकबाकी असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

बड्या थकबाकीदार कर्मचाऱ्यांना सवलत

महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांकडे असलेल्या थकबाकीसंदर्भात सक्तीने वसुली करण्याचा दिखावा प्रशासन करीत असले तरी दुसरीकडे बड्या थकबाकीदार कर्मचाऱ्यांना सवलतही देण्यात आली आहे. त्यांच्याकडून दोन ते तीन हप्‍प्त्यात ही वसुली केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

PCB T20 WC 2024 : टी 20 वर्ल्डकप जिंकला तर पाकिस्तानी खेळाडू होणार करोडपती; PCB ने दिलं मोठं आश्वासन

LinkedIn Job Search : नोकरीची चिंता आता सोडा.! लिंक्डइनवर जॉब शोधण्याची ‘ही’ आहे सोपी पद्धत

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचाही पलटवार; पंजाबची गळती सुरू जवळपास निम्मा संघ गारद

Baramati Lok Sabha Election : 'तुम्ही आमचा जीव, आत्मा आहात...' बारामतीमधील सभेत रोहित पवारांना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT