Water Supply esakal
अकोला

अकोला : मनपा मूळ हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू

नऊ जलकुंभातून नवीन वेळापत्रकाची अंमलबजावणी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शहरातील दोन नव्याने बांधण्यात आलेल्या जलकुंभासह नऊ जलकुंभातून महानगरपालिकेच्या मुळ हद्दीत दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित जलकुंभातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढीत मात्र अद्यापही पाच दिवसा आड पाणीपुरवठा सुरू आहे.

महापालिकेची हद्दवाढ होण्यापूर्वी शहरात १४ जलकुंभ होते. याच १४ जलकुंभाच्या माध्यमातून दोन कोटी ४४ लाख ५० हजार लिटर साठवण क्षमता निर्माण झाली होती. दरडोई होणारा पाणीपुरवठा लक्षात घेता, एवढ्या साठवण क्षमतेतून दोन दिवसाआड पाणी पुरवठा शक्य नसल्याने अमृत योजनेतून सात जलकुंभ बांधण्यात आले. या सर्व जलकुंभाचे बांधकाम व चाचणी सुरू झाल्याने आता साठवण क्षमता तीन कोटी ७२ लाख लिटर झाली आहे. त्यामुळेच आता शहराच्या मुळ हद्दीतील जुलकुंभांवरून दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

या जलकुंभाच्या परिसरात अंमलबजावणी

तोष्णीवाल ले-आऊट, महाजनी प्लॉट (दोन जलकुंभ), आदर्श कॉलनी (दोन जलकुंभ), नेहरु पार्क चौक, श्रद्धा नगर, केशव नगर, न्यायालया समोरील मनपा शाळा या जलकुंभातून दोन दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. उर्वरित जलकुंभातून चाचणी सुरू असल्याने व अनेक तांत्रिक अडचणी त्यात समोर झाल्याने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे अद्याप शक्य झाले नाही.

हद्दवाढीत नवीन जलवाहिन्यांची प्रतीक्षा

अमृत योजनेच्या पहिल्या टप्प्यात मनपाच्या मूळ हद्दीतच जलवाहिनी टाकण्याची कामे करण्यात आली. त्यामुळे हद्दवाढीत आता अमृत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातून नवीन जलवाहिन्या टाकण्यात येतील. त्यानंतरच हद्दवाढीतील क्षेत्रात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तोपर्यंत पाच दिवसा आड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archaeological Survey of India: भारतात सापडला २,३०० वर्षे जुना रहस्यमय शिलालेख; एक मॅसेजने इतिहासात खळबळ... आता ASI करणार चौकशी!

Shaktipith project : इको सेन्सिटिव्ह झोनचा प्रभाव; शक्तिपीठ प्रकल्पासाठी कडक निकष, २५ गावांसाठी अधिसूचना

Mumbai Crime: मुंबई जैन मंदिरातील दीड कोटींची चोरी उघड; पोलिसांची धडाकेबाज कारवाई, ‘चंबळ’तील अट्टल गुन्हेगार ४८ तासांत जेरबंद!

अजय देवगणसाठी तब्बू झालेली वेडी! एक दोन नाहीतर 'या' ९ अभिनेत्रींसोबत अजयचं सुरू होतं प्रेम प्रकरण, एकीसोबत तर आज सुद्धा नाव

Latest Marathi News Live Update : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचा गॅस पुरवठा खंडित असल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम

SCROLL FOR NEXT