Government Medical College Akola sakal
अकोला

अकोला : दीड वर्षानंतर कोविड योद्ध्यांना थकीत वेतन

पहिल्या लाटेत सेवा दिल्यानंतर सुद्धा थकले होती साडेपाच महिन्यांचे वेतन

सकाळ वृत्तसेवा

अकोला : कोरोनाच्या पहिल्या लाटेत जीव धोक्यात टाकून रूग्णांची सेवा करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (जीएमसी) रोजंदारीवरील कोरोना योद्ध्यांचा साडेपाच महिन्यांचा पगार गत दीड वर्षांपासून रखडला होता. त्यामुळे कोविड योद्ध्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. परंतु आता शासनामार्फत त्यांच्या थकीत वेतनासाठी निधी देण्यात आला असून थकीत वेतन देण्याची देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने कोविड योद्ध्यांच्या रखडलेल्या वेतनाचा मुद्दा मार्गी लागला आहे.

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेत नागरिकांमध्ये कोविड बाबत अधिक जागरूकता नव्हती. कोरोनाच्या विळख्यात सापडल्यास मृत्यू निश्चित, असा समज नागरिकांमध्ये होते. त्यामुळे अनेक गैरसमज समाजात पसरले होते. कोरोना रुग्णांपासून सर्वच नागरिक सुरक्षित अंतर ठेवत असत. संसर्गाद्वारे वेगाने फैलणाऱ्या या विषाणूच्या विळख्यात सापलेल्या रुग्णांच्या सेवेसाठी त्यावेळी एकही व्यक्ती तयार होत नव्हता. अशा अतितटिच्या प्रसंगी १८० कोविड योद्ध्यांनी जीव मुठित घालून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड कक्षात कोविड रूग्णांची सेवा केली.

त्यांना जीएमसीमध्ये रोजंदारीवर सेवेत घेण्यात आले. रक्तांची नाती ज्या आजाराने दुरावली त्या आजाराने ग्रस्त रुग्णांची या रोजंदारी वरील मजुरांनी सेवा केली. परंतु सेवेच्या बदल्यात त्यांना वेळेवर वेतन सुद्धा मिळाले नाही. परंतु आता दीड वर्षानंतर त्यांच्या थकीत वेतनासाठी शासनाने एसडीआरफच्या निधीतून ५६ लाख रुपयांचा रक्कम उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे १८० कोविड योद्ध्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागला आहे.

असे थकीत होते वेतन

एप्रिल २०१९ मध्ये १८० कोविड योद्ध्यांना जीएमसीमध्ये रोजंदारीवर सेवेत घेण्यात आले होते. त्यानंतर शासनाने मे २०२० मध्ये सर्व रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या, कारण राज्यभरात कोरोनाची रूग्णसंख्या कमी झाली होती. याच वेळी अकोल्यात मात्र रुग्ण संख्या वाढतीच होती. त्यामुळे जीएमसीमधील रोजंदारीवरील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर २०२० पर्यंत सेवेत ठेवण्यात आले व त्यानंतर त्यांना कमी करण्यात आले. यावेळी त्यांचे जून ते ऑक्टोबर पर्यंतचे वेतन थकीत होते. परंतु निधीच उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांच्या रोषाचा सामना जीएमसी प्रशासनाला करावा लागला होता. दरम्यान आता त्यांच्या वेतनासाठी निधी मिळाला असून थकीत वेतन अदा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

कोरोना योद्ध्यांच्या थकीत वेतनासाठी ५६ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. त्यानुसार संबंधितांना वेतन देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

- डॉ. मीनाक्षी गजभिये अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT