Akola sakal
अकोला

Akola: पाच पोलिसांना जामिन नाहीच, कोठडीतील मारहणीत झाला होता तरुणाचा मृत्यू

Police Crime: पोलिस कोठडीत गोवर्धन मृत्यू प्रकरणात सुनावणी, अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी अकोट न्यायालयाने सुनावणी झाली.

योगेश फरपट

Akola Crime: मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात संशयीत म्हणून ताब्यात घेतलेल्या गोवर्धन हरमकार मृत्यू प्रकरणात आरोपी असलेल्या ‘त्या’ पाच पोलिस कर्मचाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्जावर मंगळवारी अकोट न्यायालयाने सुनावणी झाली.

जिल्हा व सत्र न्यायाधीश बी.एम. पाटील यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये डीबी पथकात कार्यरत पोलिस शिपाई रवि सदांशिव, मनिष कुलट, विशाल हिवरे, प्रेमानंद पचांग, सागर मोरे यांनी मृतक गोवर्धन हरमकार याचे ‘कष्टडी डेथ’ प्रकरणात दाखल केलेला अटकपुर्व जमानत अर्ज फेटाळला आहे.

या प्रकरणात सरकारतर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी जमानत अर्जावर लेखी उत्तर सादर करून युक्तीवाद केला. १६ एप्रिलरोजी मृतक गोवर्धन हरमकार याचे काका सुखदेव हरमकार यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला की, त्यांचा पुतण्या गोवर्धन हरमकार याला १५ जानेवारीरोजी अकोट शहर पोलीस स्टेशन चे उपनिरिक्षक जवरे यांनी अकोट शहर पोलीस स्टेशनला नेले.

१६ जानेवारीला पीएसआय जवरे व इतर ३ पोलीस कर्मचारी यांनी रात्री ८ ते ९ च्या सुमारास सुकळी येथे आणले. पोलिसांनी गोवर्धनसह मला सुद्धा मारहाण केली. त्याला जास्त मार असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला अकोट सरकारी दवाखाण्यामध्ये रेफर केले. परंतु त्याला सरकारी दवाखाण्यात न नेता अकोला येथे खाजगी दवाखाण्यात नेले.

१७ जानेवारीला उपचारादरम्यान अकोला येथे गोवर्धनचा खाजगी हॉस्पीटलमध्ये मृत्यू झाला. त्याचे पी.एम झाल्यानंतर प्रेत सुकळी येथे न नेता मोहता मिल मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करून जाळण्यात आले. अशा लेखी रिपोर्टवरून वरील गुन्हा आरोपींविरूध्द दाखल करण्यात आला. घटनेच्या कालावधीमध्ये सर्व आरोपी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे प्रगटीकरण पथकात नेमणूकीस होते व घटनेच्या कालावधीमध्ये कर्तव्यावर हजर असल्याबाबतचे पोलीस स्टेशनचे डयुटी चार्ज व दैनंदिन गनणेवरून दिसून येते.

शवविच्छेदनात २५ जखमांचा उल्लेख

सरकारी वकील अजित देशमुख यांनी वि. न्यायालयास निदर्शनास आणुन दिले की, गोवर्धन हरमकार यांचे शवविच्छेदन अहवालाची पाहणी केल्यास त्याच्या शरीरावर २५ जखमांचा उल्लेख डॉक्टरांनी केलेला आहे व मरणाचे कारण या जखमांचा शॉक लागल्यामुळेच मृत्यु झाला असे नमुद केले आहे. तसेच पी.एम. रिपोर्ट च्या कॉलम क्र. १७ मध्ये नमूद असलेल्या जखमा हया रस्ते अपघातात किंवा स्वतः दारू पिऊन वारंवार पडल्यामुळे होवू शकत नाही याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्याचा अभिप्राय प्राप्त आहे.

त्यावरून सदर जखमा मारहाणीच्या असल्याचे निष्पन्न होते. आरोपी हे डि.बी. पथकातील असून, त्यापैकी कोणी कोणी मारहाण केली याबाबत विचारपूस करणे अत्यंत गरजेचे आहे. सर्व आरोपीची पोलीस कोठडीमध्ये चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय या अत्यंत गंभीर तपासाची दिशा ठरविता येणार नाही.

सीआयडीचा तपास सुरुच

घटनेतील मृतकास मारहाण झाली आहे, त्यासंबंधी वस्तु/शस्त्र या गुन्हयात बाकी आहे. तसेच आरोपींचे मोबाईल फोन जप्त करणे गरजेचे आहे व सदर गंभीर प्रकरणाचा तपास सी. आय डी अमरावती च्या पोलीस उपअधिक्षक दिप्ती ब्राम्हणे करित असुन, तपास हा अजुन पुर्ण झालेला नाही व प्राथमिक स्तरावर आहे.

वरील कारणांमुळे आरोपींचा अटकपूर्व जामीनाचा अर्ज नामंजुर करण्यात यावा असा युक्तीवाद सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अजित देशमुख यांनी विद्यमान न्यायालयात केला. दोन्ही पक्षाच्या युक्तीवादानंतर विद्यमान कोर्टाने आरोपींचा अटकपुर्व जमानत अर्ज नामंजूर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT