thief Sakal
अकोला

वॉचमनला चाकूचा धाक दाखवून धाडसी चोरी; पावणेसहा लाखांचा मुद्देमाल लंपास

बिल्डिंगच्या वॉचमनला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा : घरातील कुटुंब दहाव्याच्या कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेल्याने बिल्डिंगच्या वॉचमनला चाकूचा धाक दाखवून घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम व दुचाकी असा एकूण ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अनोळखी तिघा चोरट्यांनी चोरून नेला. याबाबत पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून शहरातील सिव्हील कॉलनीत घडलेल्या या धाडसी चोरी ने परिसरात भीतीचे वातावरण आहे.(Akola Crime News)

याबाबत पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार शहरातील सिविल कॉलनी स्थित परम क्लासेस जवळ ज्ञानेश्वर श्रीराम शेजुळ यांचे कुटुंब राहते ज्ञानेश्वर शेजुळ यांचे सासरे वारल्याने दहाव्याच्या कार्यक्रमाला ते पैठण येथे कुटुंबासह गेले होते. दरम्यान शुक्रवारी रात्री उशिरा त्यांच्या बिल्डिंगच्या वॉचमनला चाकूचा धाक दाखवून तीन अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश केला.

घरातील सोने चांदीचे दागिने किंमत ४ लाख ४२ हजार, रोख 30 हजार रुपये, घरातील डीव्हीआर, राहूटर, एक दुचाकी क्रमांक एम एच 28 बीजी- 0014 किंमत ९८ हजार वाचमेन चा मोबाईल असा एकूण ५ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. सदर घटना रात्री अडीच दरम्यान घडली संबंधित तिला चोरट्यांना केशव संपतराव नादरे यांनी पाहिले असून चोरट्याचे अंगात जर्किन होते.

घरात धाडसी चोरी झाल्याची माहिती मिळाल्या नंतर पैठण येथून परत येऊन सदर प्रकरणात ज्ञानेश्वर श्रीराम शेजुळ वय ४६ राहणार सिविल कॉलनी यांनी पोलिसात फिर्याद नोंदविली. यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य पाहता बुलढाणा येथून ठसे तज्ञ व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. ठाणेदार जयवंत सातव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक डीएम वाघमारे सदर धाडसी चोरीच्या प्रकरणात तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT