crime sakal
अकोला

बाळापूर : अफूची बोंडे, डोडा पावडरची विक्री

सर्व्हिस सेंटरवर कारवाई; तलवार व देशी-विदेशी दारूसह दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर : राष्ट्रीय महामार्गावरील कलकत्ता ढाब्याच्या परिसरात दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या दोन वेगवेगळ्या कारवाईत एक तलवार, मादक पदार्थ व देशी-विदेशी दारूसह १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई शनिवारी (ता. २५) सायंकाळच्या सुमारास दहशतवाद विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.

राष्ट्रीय महामार्गावरील रिधोरा नजीक असलेल्या कलकत्ता ढाब्याच्या परिसरात असलेल्या एका सर्व्हिस सेंटरजवळ एक इसम मादक पदार्थांची विक्री करत आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना मिळाली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार कलकत्ता ढाबा येथे सदर पथकाने छापा टाकला.

यावेळी आरोपी बालाजी शेषराव पाटील (वय २४, रा. कलकत्ता ढाबा) हा मादक पदार्थ विक्री करताना आढळून आला. त्याच्या जवळून आमली मादक पदार्थ ४ किलो, अफूची बोंडे, डोडा पावडर किंमत २० हजार रुपये, एक तलवार किंमत १००० रुपये व आरोपी मधुकर किसन मुंडे (वय ५३, रा. रिधोरा) कडून देशीदारुच्या दहा बाटल्या किंमत ३८ हजार ८०० रुपये, विदेशी दारूच्या तीन पेट्या किंमत ३० हजार ८०० रुपये, एक मोबाईल किंमत ३५ हजार रुपये असा एकूण १ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर माल विनापरवाना असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दोन्ही आरोपींवर बाळापूर पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT