Crime News  esakal
अकोला

Akola Crime : प्रा. रणजीत इंगळे यांच्या मारेकऱ्यांचा शोध सुरू

प्रा. रणजीत देवराव इंगळे हे दिव्यांग असल्याने तीनचाकी वाहनाने शनिवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घरी जात होते. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता

सकाळ वृत्तसेवा

Akola Crime - शनिवारी रात्री बारा वाजताच्या दरम्यान प्रतिष्ठीत प्रा. रणजीत इंगळे (वय ५०, रा. गंगानगर वाशिम बायपास) यांची वाशिम बायपास येथे अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आणि हल्लेखोर पळून गेले. पोलिसांनी घटनास्थळा जवळील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

विशेष म्हणजे, मारेकऱ्यांनी इंगळे यांचा मोबाईल सोबत नेला होता. त्याचे लोकेशन मोर्णा नदीच्या पुलापर्यंतच दिसत असून, त्यानंतर हा मोबाईल नदीच्या पात्रात फेकून दिला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

प्रा. रणजीत देवराव इंगळे हे दिव्यांग असल्याने तीनचाकी वाहनाने शनिवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घरी जात होते. हल्लेखोरांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारून त्यांना गंभीर जखमी केले होते. त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर रस्त्याच्या कडेला त्यांचा मृतदेह टाकून आरोपी पसार झाले होते.

पोलिसांच्या पंचनामा दरम्यान प्रा. इंगळे यांच्या जवळ ४१ हजार रुपयांची रोकड होती. हल्लेखोरांनी प्रा. इंगळे यांच्याकडे असलेली रोकड लुटली नाही तर त्यांचा मोबाइल फोन मात्र घेऊन पळून गेले.

लुटमारीच्या इराद्याने हल्लेखोरांनी हल्ला चढवला नसल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून, नेमके कोणत्या कारणामुळे त्यांची हत्या केली असावा, याची कारणे पोलिस शोधत आहेत. प्रा. इंगळे हे एक साप्ताहिक चालवायचे. चळवळीत, सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असायचा. या गुन्ह्याचा तपास जुने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यात पुढील ५ दिवस हवामान बिघडणार! पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी; विभागाकडून सतर्कतेचं आवाहन

Pakistan Blast: पाकिस्तान पुन्हा हादरलं! शांतता रॅलीत भीषण स्फोट; १४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी, नेमकं काय घडलं?

प्रश्न कमी, परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये; NEET PG 2026 चे नवे नियम जाहीर, 'या' 5 गोष्टी जाणून घ्या...

FDA थेट हॉटेलचा परवाना निलंबित का करते? तुकाराम मुंढेंनी कारवाईमागचं नेमकं कारणच सांगितलं! जाणून घ्या कायदा...

Gangaapur Accident: गंगापूर फाट्याजवळ उभ्या ट्रकला आयशरची जोरदार धडक; २५ वर्षीय चालक गणी शेख जागीच ठार

SCROLL FOR NEXT