akola crime update Petrol theft Gaigaon depot  sakal
अकोला

अकोला : गायगाव डेपोतून पेट्रोल चोरी

पोलिसांनी जप्त केले २८० लिटर पेट्रोल

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गायगाव येथे असलेल्या विविध ऑईल कंपनीच्या डेपोतून पेट्रोल, डिझेलची सर्सार चोरी होत आहे. डाबकी रोड पोलिसांनी एकाच महिन्यात दोन वेळा पेट्रोल चोरीची घटना उघडकीस आणली आहे. सोमवारी पहाटेच्या सुमारास कारवाई करीत पोलिसांनी २८० लिटर पेट्रोल जप्त केले. आरोपी घटना स्थळावरून फरार होण्यात यशस्वी झाला.

डाबकी रोड पोलिस स्टेशनच्या हद्दीत ता. २७ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर पोलिस गस्तीवर असताना गायगाव रोडवरील कस्तुरी चॅरिटेबल ट्रस्ट जवळ एक व्यक्ती बेकायदेशिररित्या ज्वलनशिल इंधन पेट्रोल वाहतूक करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला असता तो गाडी सोडून पडून गेला. गाडीची झडती घेतली असता त्यात आठ कॅनमध्ये २८० लिटर पेट्रोल आढळून आले. या पेट्रोलचे बाजार मूल्य ३० हजार रुपये आहे.

पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपीचा शोध सुरू केला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार अधनियमान्वये डाबकी रोड पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनात डाबकी रोड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे, मुन्ना ठाकुर, दीपक तायडे, रविंद्र करनकार यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरातून पुन्हा एल्गार, सतेज पाटील, राजू शेट्टींच्या सोबतीने शेतकरी ताकद दाखविणार

'कमळी' मालिकेत लोकप्रिय अभिनेत्रीची एंट्री; म्युझिक टिचर बनून येतेय सगळ्यांना वेड लावणारी गायिका, चाहते खुश

Yuvraj Singh: 'धोनी अचानक आला, भारताचा कॅप्टन झाला, त्यावेळी मी...', युवराजचं थेट भाष्य; निवृत्तीबाबतही केला धक्कादायक खुलासा

काळजाचा थरकाप! अचानक टायर फुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; ५ वर्षांच्या चिमुकल्याचा करुण अंत

पाकिस्तानात पेट्रोलच्या दरात ऐतिहासिक कपात; नव्या किमती ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

SCROLL FOR NEXT