akola crime update widow women killing case accused sentence life imprisonment Sakal
अकोला

Akola Crime News : विधवेची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप; मूर्तिजापूर तालुक्यातील हत्याकांड

मूर्तिजापूर तालुक्यातील धोतरा शिंदे फाट्याजवळ घडले होते हत्याकांड

सकाळ वृत्तसेवा

Akola Crime : विधवा महिलेला लग्नासाठी तगादा लावत महिलेला सतत त्रास देणाऱ्या आरोपीने महिलेची हत्या केल्यामुळे त्याला विद्यमान तिसरे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सुनील एम. पाटील यांनी खूनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावली. शिक्षा झालेल्याचे आरोपीचे नाव धनराज प्रल्हाद साठे (रा. धोतरा शिंदे, ता. मूर्तिजापूर) आहे.

घटनेची हकीकत अशी की, मृतक सविता अंकुश दुधे हिचे पती घटनेच्या एक वर्षापूर्वी अपघातात मरण पावले होते. मृतक महिला तिच्या दोन लहान मुलांसोबत राहत होती. त्याच गावात राहणारा आरोपी धनराज साठे हा तिला लग्न करण्यासाठी नेहमी तगादा लावत होता.

मृतक ही त्याला लग्नाकरिता नकार देत होती. त्यामुळे त्यांच्यात बरेचदा वाद होत होते. १८ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी फिर्यादी किशोर तुळशीराम दुधे याच्या ऑटामध्ये मृतक सविता तिचे दोन लहान मुलं, आरोपी धनराज साठे व इतर ५ प्रवाशी यांना घेवून मूर्तिजापूर येथून धोतरा शिंदे गावाला जाण्याकरिता निघाले होते.

धोतरा शिंदे फाट्या जवळ पोहोचताच आरोपीने त्याच्या जवळील चाकू काढून ऑटोमध्येच मृतक हिचे केस धरुन मानेवर, तोंडावर वार करुन तिचा खून केला होता. त्यामुळे या प्रकरणी पोलिस स्टेशन मूर्तिजापूर ग्रामीण येथे आरोपीविरुध्द भादंविचे कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप मडावी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाने गुन्हा सिद्ध करण्यासाठी एकूण नऊ साक्षीदार तपासले. बचावपक्षा तर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले.

सरकार पक्षाचे पुरावे ग्राह्य मानून दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीला कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीला अतिरिक्त सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी वकील आनंद गोदे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

प्रत्यक्षदर्शीचे बयान ठरले महत्वाचे

वरिल प्रकरणामध्ये मृतक महिलेचा मुलगा आदर्श (वय ११) हा घटनेच्या वेळी उपस्थित होता. तो हत्येचा प्रत्यदर्शी साक्षिदार असल्याने महत्वपूर्ण ठरला. सरकारी पंच, डॉक्टर व तपास अधिकारी यांचे व्यतिरिक्त इतर साक्षिदार सरकार पक्षास फितूर झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT