Akola Crimes filed against 21 persons to Damage vehicles
Akola Crimes filed against 21 persons to Damage vehicles sakal
अकोला

अकाेला : गाड्यांची तोडफोड करणाऱ्या २१ जणांवर गुन्हे दाखल

सकाळ वृत्तसेवा

पातूर : शहर पोलिस स्टेशन हद्दीत येत असलेल्या भंडारज (बु.) येथे क्षुल्लक कारणामुळे वाद होऊन वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्याने मॉन्टोकार्लो कंपनीच्या तब्ब्ल १४ गाड्यांची तोडफोड करून चार जण जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार भंडारज (बु.) येथील माजी सरपंच दीपक इंगळे हे आपल्या दुचाकीने जात असता त्यांचा अपघात झाला. याबाबत इंगळे यांनी मॉन्ट्रोकार्लो कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जाब विचारला असता, संबंधित कर्मचाऱ्यांनी त्यांना उद्धटपणे उत्तर दिली. या घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच गावातील ३० ते ४० युवक हातात लोखंडी पाईप, काठ्या आणून कंपनीच्या वाहनांवर हल्लाबोल करून तब्ब्ल १४ वाहनांचे काचा फोडून नुकसान केले.

काही कर्मचाऱ्यांनाही मारहाण करण्यात आली. यामध्ये कृष्णा अण्णप्पा लोखंडे, संजयसिंह जुदागीरसिंग, रितुराज श्रीबाळकृष्ण, विनोद विद्यासागर भारती हे जखमी झाले असून, फिर्यादी कृष्णा अण्णप्पा लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गणेश दिगंबर भगत, विवेक दीपक इंगळे, गौरव दीपक इंगळे, ऋषिकेश बळीराम इंगळे, श्रीकृष्ण देवराव इंगळे, गुणसागर वामन इंगळे, संतोष लक्ष्मण इंगळे यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध विविध कलमानुसार शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karan Bhushan Singh: ब्रिजभूषण सिंहच्या मुलाच्या प्रचार रॅलीत फायरिंग? चौकशीतून काय समोर आलं?

Vada Pav Girl: ना अटक झाली, ना केस.. मग वडापाव गर्लला का घेऊन गेले दिल्ली पोलीस? व्हायरल व्हिडीओमागचं सत्य

Latest Marathi News Live Update : केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी वलसाडमध्ये जाहीर सभेला संबोधित केले

Tesla vs Tesla: ट्रेडमार्कवरून पेटला वाद! टेस्ला भारतीय कंपनीविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात; काय आहे प्रकरण?

Temperature : सोलापुरात ४३.२ अंश सेल्सिअसची नोंद; पुढील दोन दिवस पुन्हा ४४ पारा

SCROLL FOR NEXT