hacker
hacker sakal
अकोला

अकोला : ॲप डाऊनलोड करताच पेंशन खात्यातून ५९ हजार काढले

सकाळ वृत्तसेवा

अकोला : ऑनलाइन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. नागरिकही आलेल्या मॅसेजला आणि कॉलला उत्तर देऊन बळी पडत आहेत. अशीच घटना रामदासपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. पेंशनधारक महिलेला एक मॅसेज आला. तुमचे सीम कार्ड बंद होणार आहे. तुम्ही हे ॲप डाऊललोड करा, असे केल्यानंतर महिलेच्या खात्यातून ५९ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. रामदासपेठ पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेजा मंगेश फडणीस (वय ६२ रा. भागवत प्लाट) यांना ता. ३० मार्च रोजी त्यांच्या मोबाइलवर सीम कार्ड ब्लॉक होईल, असा मॅसेज आला. तेव्हा मॅसेजमधील कस्टमर केअर नंबरवर संपर्क केला असता त्यांनी सांगितले की पेटीएम, क्वीक सपोर्ट व बीएसएनएल एनी डेस्क हे डाऊनलोड करून घेतले. त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, आपल्या एसीबीआयच्या पेंशन खात्यातून ५९ हजार रुपये काढून फसवणूक केली. त्यानंतर त्यांनी बँक स्टेटमेंट तपासले असता त्यांना ६.१८ ते ६.२६ वाजता दरम्यान रक्कम काढल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Viral Video: "मला माहीत आहे 'डिक्टेटर' यासाठी अटक करणार नाही," ट्रोल होऊनही पंतप्रधानांचे भन्नाट उत्तर

काँग्रेसच्या प्रयत्नांवर वडेट्टीवारांनी पाणी फेरले, निवडणूक संपेपर्यंत शांत बसण्याचे निर्देश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. प्रणिती शिंदे, आदिती तटकरे, शाहू महाराजांनी केलं मतदान

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Sakal Podcast : मावळ लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? ते सुनीता विल्यम्सची पुन्हा अवकाश भरारी

SCROLL FOR NEXT