Akola District Annual Plan Development sakal
अकोला

अकोला : १८ दिवसांत ९७ कोटी खर्चाचे आव्हान

जिल्हा वार्षिक योजना; निधी खर्चाची कासव गती

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्ह्यात विविध विकास कामे करण्यासाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी नियोजन विभागाला मिळालेल्या १८५ कोटी रुपयांच्या निधीपैकी आतापर्यंत विकास कामांवर केवळ ८७ कोटी ८६ लाख रुपयेच खर्च होऊ शकले आहेत. त्यामुळे आर्थिक वर्ष संपायला जेमतेम १८ दिवस शिल्लक असतानाच प्रशासनासमोर ९७ कोटी १३ लाख ४७ हजार रुपये खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. प्राप्त निधीपैकी विविध शासकीय यंत्रणांना १३१ कोटी ८३ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले असून, प्राप्त निधीचा उपयोग न झाल्यास प्रशासनावर निधी परत जाण्याची नामुष्की ओठावू शकते.

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत शासनाकडून प्रत्येक जिल्ह्याला विकास कामे करण्यासाठी निधी मिळताे. या संपूर्ण निधीचे नियोजन, वितरण व खर्च करून घेण्याची जबाबदारी जिल्हा नियोजन कार्यालय अर्थातच जिल्हाधिकारी कार्यालयाची असते. सन् २०२१-२२ या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक याेजनेेअंतर्गत जिल्ह्यात विविध प्रकारची विकास कामे करण्यासाठी शासनाने जिल्हा नियाेजन समितीला १८५ काेटी रूपयांचा निधी मंजूर केला. त्यापैकी संपूर्ण निधी नियाेजन विभागाला प्राप्त झाला आहे. प्राप्त निधीपैकी बहुतांश रक्कमेच्या विकास कामांना प्रशासकीय मंजुरी सुद्धा देण्यात आली आहे, तर नियाेजन विभागाने विकास कामांसाठी आतापर्यंत एकूण १३१ काेटी ८३ लाख रुपयांचे वाटप संबंंधित शासकीय यंत्रणांना केले आहे. त्यापैकी ८७ कोटी ८६ लाख रुपयांचा निधी खर्च सुद्धा करण्यात आला आहे. परंतु निधी खर्चाची गती कमी असल्यामुळे व आर्थिक वर्ष संपायला जेमतेम दिवस शिल्लक असल्याने कमी वेळेत निधी खर्चाचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

कोरोनाचे ग्रहण सुटले

गत दोन वर्षांपासून कोरोना विषाणूने राज्यभर आणि जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याने जिल्हा वार्षिक योजनेला सुद्धा कोरोनाचे ग्रहण लागले होते. त्यामुळेच जिल्हा वार्षिक योजनेच्या पहिल्या वर्षी मंजूर निधीच्या केवळ ३३ टक्केच निधी देण्याचे शासनाने जाहीर केले होते. यासोबतच सलग दोन वर्ष २५ टक्के निधी आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी सुद्धा राखीव ठेवला होता. त्यामुळे विकास कामे काही प्रमाणात प्रभावित झाली होती. दरम्यान या आर्थिक वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव फारसा न राहिल्याने जिल्हा वार्षिक योजनेवरील कोरोनाचे ग्रहण सुद्धा सुटले आहे.

निधी खर्चावर दृष्टीक्षेप

  •  जिल्हा वार्षिक याेजना - १८५ काेटी

  •  मिळालेला निधी - १८५ काेटी

  •  यंत्रणांना वाटप - १३१ काेटी ८३ लाख

  •  खर्च - ८७ कोटी ८६ लाख

  •  शिल्लक निधी - ९७ कोटी १३ लाख

''जिल्हा वार्षिक योजनेसाठी आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये १८५ कोटींचा निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी ८७ कोटी ८६ लाख रूपयांचा निधी खर्च झाला असून उर्वरीत निधी आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी खर्च होईल. त्यासाठी नियोजन झाले असून निधी खर्चाचे काम सुद्धा अंतिम टप्प्यात आहे.''

- गिरीश शास्त्री, जिल्हा नियोजन अधिकारी, अकोला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT