bal.jpg 
अकोला

अरे हे काय ? अकोल्याचा मृत्युदर राज्यपेक्षाही दुप्पट; 49 मृत्यूने वाढविली चिंता

सकाळ वृत्तसेवा

अकोला (जि. अकोला) : राज्यात कोरोनाने थैमान घातले असून, आतापर्यंत साडेतीन हजाराहून अधिक रूग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. तर अकोला जिल्ह्यात दररोज एकाचा बळी जात असून, आतापर्यंत 49 जणांचा कोरोनामुळे जीव गेला आहे. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुलनेत अकोल्यातील मृतकांची संख्या कमी असली, तरी येथील मृत्यूचा दर राज्याच्या दुप्पट असल्याची भयावह स्थिती आहे.

अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर 4.7 
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही लक्षणीय आहे. त्यामुळे मोठा दिलासाही मिळत आहे. पण, यासोबतच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यू हा चिंतेचा विषय आहे. राज्यात साडे तीन हजाराहून अधिक रुग्णांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यानुसार, राज्यातील मृत्यूदर हा 3.6 येवढा आहे. मात्र, या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यूदर 4.7 असा आहे.

अकोला जिल्ह्याचा हा मृत्यूदर राज्याच्या तुलनेत जास्त आहे. वास्तविक पाहता राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अकोला जिल्ह्यातील मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कमी आहे. मात्र, येथे दररोज एकाचा बळी जात असल्याने जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक आहे. मृत्यूचे हे प्रमाण रोखण्यासाठी प्रशासनाने वेळीच आवश्यक पावले न उचलल्यास जिल्ह्याची परिस्थिती आणखी भयावह होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

इतर आजार असणाऱ्या रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु, या रुग्णांना कोरोना व्यतिरिक्त मधुमेह, निमोनिया, हृदयविकार, उच्चरक्तदाब असेही आजार असल्याची माहिती अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू
दरम्यान रविवारी तब्बल पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील एक 68 व 55 वर्षीय दोन महिला आहे. त्याचबरोबर 58, 56 व 53 वर्षीय दोन पुरुषांचा समावेश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT