Swabhimani-Shetkari-Sanghatana esakal
अकोला

Akola : बाळापूर तहसीलवर धडकला स्वाभिमानीचा एल्गार मोर्चा

बस स्थानकापासून स्वाभिमानीचे अकोला जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांच्या नेतृत्वात मोर्चा

सकाळ डिजिटल टीम

बाळापूर : शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी (ता.२१) बाळापूर येथे एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. बस स्थानकापासून स्वाभिमानीचे अकोला जिल्हाध्यक्ष गणेश खुमकर यांच्या नेतृत्वात मोर्चा तहसीलवर पोहोचला व जाहीर सभा पार पडली.

प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रशांत डिक्कर यांनी, ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्याची मागणी केली. गणेश खुमकर सारखे कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यात तयार होतील तेव्हा शेतकरी व शेतमजूरांचे प्रश्न लवकरच सुटतील म्हणून गणेश खुमकर च्या नेतृत्वाखाली संघटितपणे काम करा असे आव्हान प्रशांत डिक्कर त्यांनी यावेळी शेतकऱ्यांना केले.

सोयाबीनला प्रति क्विंटल १० हजार व कापसाला प्रति क्विंटल १५ हजार रुपये शासनाने हमीभाव द्यावा, अशी मागणी खुमकर यांनी केली. मराठवाडा अध्यक्ष बंगाळे पाटील यांनी, राजकीय पक्ष शेतकऱ्यांचा घात करतात म्हणून शेतकऱ्यांनीच यापुढे स्वाभिमानीच्या बॅनरखाली संघटित होणे हीच काळाची गरज असल्याचे सांगितले. मोर्चात आलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज व मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PORTUGAL VS UZBEKISTAN: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे विक्रम, विक्रम, विक्रम... पोर्तुगालचा ५-० असा दणदणीत विजय, Fifa World Cup च्या बाद फेरीच्या दिशेने कूच

Cristiano Ronaldo Record: ६० वर्ष एकाच व्यक्तीच्या नावे होता विक्रम, रोनाल्डोने ३३ मिनिटांत मोडला! गोलरक्षकाला गंडवलं Video तुफान Viral.. मेस्सीही मागे पडला

Cristiano Ronaldo Record: "नाद करा, पण आमचा कुठं..." ख्रिस्तियानो रोनाल्डो आला अन् मैदान गाजवलं; रेकॉर्ड ब्रेकिंग गोल्स Video Viral

Cristiano Ronaldo Create History: अविश्वसनीय! रोनाल्डोचा विश्वविक्रम; World Cup मध्ये असा पराक्रम करणारा जगातील पहिलाच, मेस्सीचाही विक्रम मोडला, Video

Tanker Mafia : नागरिकांची आर्थिक पिळवणूक! टँकरमाफियांना महापालिकेची फूस; अवाच्या सवा दराने पाण्याची विक्री

SCROLL FOR NEXT