Heavy rains in western part of Kolhapur Heavy rain forecast for Saturday warning alert Akola
अकोला

Akola News: पावसाचे तीन महिने उलटूनही जिल्ह्यात पावसाची तुट कायम

पावसाची पाठ,शेतकरी चिंतातूर!

मनोज भिवगडे

अकोला - श्रावणातील एक आठवडा उलटूनही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविली आहे. दमदार पावसाचा तीन महिन्यांचा काळ निघून गेल्यानंतरही जिल्ह्यात पावसाची मोठी तुट कायम आहे. एकीकडे पीकं वाचविण्यासाठी शेतकरी धडपडत आहेत तर दुसरीकडे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पुरेशा पाणीसाठा न झाल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होणार आहे.

अकोला जिल्ह्यात ता. २३ ऑगस्टपर्यंत सरासरी पावसाच्या तुलनेत ६८.६ टक्केच पाऊस झाला आहे. गतवर्षी याच काळात एकूण ९७.४ टक्के पाऊस झाला होता. सरासरी पावसाच्या तुलने ५० टक्के तुट असल्याने येत्या काळात शेतकऱ्यांपुढे पीकं जगविण्याचा प्रश्न उभा ठाकरणार आहे.

येत्या काही दिवसात पाऊस न झाल्यास उत्पादनात मोठ्याप्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. सोबतच जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेशा जलसाठा अद्याप न झाल्यामुळे रब्बीत पिकांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकणार नाही. खरीपासोबतच रब्बीतही शेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण होणार आहे.

सप्टेंबरचा पाऊस बेभरवश्याचा

अकोला जिल्ह्यात नियमित पावसाचे दिवस जून ते ऑगस्ट या तीन महिन्यातच असते. सप्टेंबरमधील पाऊस हा बेभरवश्याचा असल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या छायेत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रब्बीतही येणार अडचणी

अकोला जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सुमारे ४० ते ५० टक्के पाऊस कमी पडलेला आहे. परिणामी जिल्ह्यातील प्रकल्पांची पाणी पातळी आवश्यक तेवढ्या प्रमाणात वाढली नाही.

पावसाची स्थिती अशीच कायम राहिल्यास पिण्यासाठी पाणी राखीव ठेवणे बंधनकारक होणार असल्याने रब्बीत सिंचनासाठी पाणी मिळू शकणार नाही. त्यामुळे खरीपापाठोपाठ रब्बीतही शेतकरी अडचणीत येऊ शकतो.

ऑगस्ट अखेरपर्यंत दमदार पावसाची शक्यता कमीच

अकोला जिल्ह्यातील येत्या आठवडाभराचा पावसाचा अंदाज बघता ऑगस्ट अखेरपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस होण्याची शक्यता कमीच आहे. काही भागात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी येत आहेत. मात्र, हा पाऊस पुरशा नाही. श्रावणातील दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांसोबतच संपूर्ण जिल्ह्याला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत झालेला एकूण पाऊस

तालुका पाऊस (मि.मि.) सामान्य पावसाची टक्केवारी

अकोट २५६.३ ५०.६

तेल्हारा ४२६.१ ८७.३

बाळापूर ३५४.१ ७६.८

पातूर ३६७.८ ५८.८

अकोला ३६२.६ ७०.४

बार्शीटाकाळी ४३३.८ ८३.१

मूर्तिजापूर ३३४.६ ६३.२

सरासरी ३५६.८ ६८.६

जिल्ह्यातील प्रकल्पांतील जलसाठा

- काटेपूर्णा ः ६७.६५ टक्के

- वान ः ६७.९४ टक्के

- मोर्णा ः ७१.०७ टक्के

- निर्गुणा ः १०० टक्के

- उमा ः १०० टक्के

- दगडपारवा ः ८४.७१ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : मराठी संघटना आज पोलिस उपायुक्तांची भेट घेणार

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT