अकोला

अकोला : रोटरीच्या अभियानात २२४० नेत्र रुग्णांची तपासणी

सप्टेंबरमध्ये राबविले अभियान; ९४२ रुग्णांना चष्म्यांचा लाभ

सकाळ वृत्तसेवा

अकोला : गत अकरा वर्षांपासून फिरत्या वाहनाद्वारे नेत्र तपासणी करणाऱ्या रोटरीच्या फिरत्या नेत्र तपासणी पथकाच्या वतीने गत सप्टेंबर महिन्यात अनेक गावात नेत्र रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांच्यावर नेत्र उपचार केले. या अभियानाचा लाभ २२४० नेत्र रुग्णांना मिळाला.

रोटरी फिरते नेत्र रुग्णालय,रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ,आनंदीलाल चिरानिया ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने करोना संकटातही आयोजित या फिरत्या वाहनाच्या पथकाने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर पर्यंत अनेक गावात नेत्र तपासणी शिबिरे घेऊन नेत्र रुग्णांना औषध साहित्य वितरित केले. या अभियानात मंगरुळपीर, बार्शीटाकळी, रेडवा, कान्हेरी, विझोरा, बघेगाव, तांदुळवाडी, पिंजर, पराभवानी, धोत्रा, येवता, हातरुन, गायगाव, भौरद, जांभरून, टेम्भी, वरखेड, येळवन, सोनाळा, व्याळा, कातखेड, मोरगाव, अमनातपूर, माझोड, कापशी, खोपडी, महाशेलू, मोझरी, जानोरी, भंडारज, बाभुळगाव, शिर्ला, महान, काजळेश्वर, गांधीग्राम, आळंदा, देवळी, माळराजूरा, खिरपुरी, नांदखेड, देगाव, टाकळी, भरतपूर, मानकी, नाकाशी, राजांडा आदी गावात नेत्र रुग्णांची मोफत नेत्रतपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली होती.

या गावातील २२४० रुग्णांची नेत्रतपासणी करण्यात आली. यामध्ये ९४२ रुग्णांना चष्मे वितरित करण्यात आलीत तर, ४२ रुग्णांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली.

निवड झालेल्या मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रोटरीच्या फिरत्या नेत्रतपासणी पथकाचे केंद्र प्रमुख डॉ. जुगल चिरानिया, डॉ.सुरेश तारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक विशाल जुरेल, संतोष ठाकरे, रोहित भीमटे, रोटरी नॉर्थचे अध्यक्ष देवेंद्र वाकचौरे, सचिव महेश बाहेती व गावांच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी मेहनत घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cabinet Meeting : नागपूरमधील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रकल्पाला मंजुरी, मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ६ मोठे निर्णय, वाचा...

Mumbai Local News: यंदा रेल्वे रुळावर पाणी साचणार नाही, महापालिकेचा मोठा प्लॅन तयार; नेमकी योजना काय?

लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेची वेळ बदलली, 'या' वेळेस प्रेक्षकांच्या भेटीला, कोण घेणार निरोप?

Latest Marathi News Live Update : मिरा-भाईंदरमधील वाढत्या पाणीटंचाईमुळे मनसेचे अनोखे आंदोलन

YouTube Growth Tips: यूट्यूबवर सबस्क्राईबर्स वाढवून महिन्याला लाखो कसे कमवायचे? कंपनीने स्वतःच सांगितली भन्नाट ट्रिक

SCROLL FOR NEXT