Akola farmer farm road by Administration officials with JCB
Akola farmer farm road by Administration officials with JCB sakal
अकोला

अकाेला : रस्ता खुला करण्यासाठी प्रशासन बांधावर

सकाळ वृत्तसेवा

मानोरा : तालुक्यातील भुली येथील शेतकरी दशरथ रामधन राठोड यांच्या शेतातील मालकीचा ये-जा करण्याचा वहीवाटीचा मंजूर रस्ता अडवणूक केलेला होता. हा रस्ता खुला करून देण्यास टाळाटाळ करणाऱ्या प्रशासनाला १३ जूनपर्यंत रस्ता खुला करून देण्यात यावा. अन्यथा त्याच दिवशी कुटुंबासह आत्मदहन करणार असा इशारा शासनाला दिला होता. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी पोहचून सोमवारी रस्ता खुला करण्याच्या कारवाईला सुरुवात केली.

महाराष्ट्र महसूल जमीन अधिनियम कलम १४३ नुसार रस्ता खुला करून द्यावा, यासाठी महसूल विभागाकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार शेत वहीवाटीचा रस्ता खुला करून देण्यासंदर्भात पोलिस बंदोबस्त बोलावून महसूल विभाग ताफ्यासह कारवाईसाठी घटनास्थळी पोहचले होते. परंतु त्यावेळी विरोधकांच्या दबावात येऊन रस्ता खुला करून दिला नाही. त्यामुळे १३ जून रोजी कुटुंबासह शेतात आत्मदहन करणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आला होता. त्यानंतर प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. रस्ता खुला करून देण्यात आला. शेतात जाण्यासाठी मार्ग मोकळा केल्यामुळे पिडीत कुटुंबानी आत्मदहन करण्याचा इशारा मागे घेत प्रशासनाचे आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR Live Score: राजस्थानला तगडा धक्का! आक्रमक खेळणारा कर्णधार सॅमसन झाला बाद, शतकही हुकले

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT