Akola Farmers waiting for heavy rains
Akola Farmers waiting for heavy rains sakal
अकोला

अकाेला : शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

सकाळ वृत्तसेवा

उंबर्डा : मृग नक्षत्राची सुरूवात झाली परंतु मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार याकडे बळीराजासह सर्वांचेच डोळे आकाशा कडे लागले आहे. वरूनाच्या वक्रदृष्टीने बळीराजा घायाळ होत असून उष्णतेच्या तडाख्याने होरपळलेल्या जीवाची आस आता मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे.

मान्सूनचा दमदार पाऊस केव्हा येणार येचा वेध घेत काही शेतकऱ्यांनी विहिरीतील मुबलक पाण्यावर खरीप हंगामाच्या पिकाच्या पेरणीला प्रारंभ केला आहे. जाणकार शेतकरी दरवर्षी मृग नक्षत्र सुरू होताच खरीप हंगामाच्या पेरणीसाठी सज्ज होत असतो. काही सिंचनाच्या सोयी असल्यामुळे सिंचनाचे पाणी देऊन बि बियाण्याची पेरणी शेतकरी करित असतो. उंबर्डा बाजार परिसरात शेती मशागतीची कामे पण १००% पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पेरणी कडे लागले आहे.

ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे. त्यांनी आपल्या परीने कपाशी लागवड केली. मात्र अजूनही काही कोरडवाहू शेतकरी निसर्गाच्या दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहे. हवामान खात्याच्या अंदाजापवरून यंदा मान्सून लवकर येणार असा अंदाज व्यक्त केला. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कामाला प्राधान्य देवून नांगरणी, वखरणी, रोटावेटर करून उन्हाची पर्वा न करता घाम गाळून पेरणीसाठी जमीन सज्ज केली. त्यामुळे शेतकऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे. खरीप हंगाम हा शेतकऱ्यां‍साठी अतिशय महत्त्वाचा असतो. या हंगामावरच शेतकऱ्यांची जास्त लक्ष असते.

शेतकऱ्यांच्या व शेतीच्या आयुष्यातील महत्त्वाचे दिवस पेरणीचा काळ त्यामध्ये मान्सून वेळेवर दाखल झाला. पाऊस पडला तर शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. त्यामुळे वयोवृद्ध शेतकऱ्यांना मृग नक्षत्र सुरू होताच पेरणी करायला सुरुवात करतात. जुन्या काळापासून ग्रामीण भागात शेतकरी पक्ष्याच्या घरटी बांधणीवरून शेतकरी पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करीत असतात. तर कधी मोठ्या प्रमाणात मुंग्यां व हवेत उडणारा किड्या वरुण पावसाचा अंदाज लावायचे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मान्सूनचे वेध लागले असून शेतकरी निसर्गाच्या पावसाची वाट पहात आहे. परंतु यावर्षी वरुनाने पाठ फिरवल्याने बळीराजा घायाळ होतांना दिसत असून बळीराजाचे डोळे दमदार पावसाच्या प्रतीक्षेत लागले आहे.

विहिरीतील पाणी सुद्धा आटले

उंबर्डाबाजार परिसरात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावलेली नाही. परिणामी सर्वच भागातील विहीर व बोअरवेलच्या पाण्याने तळ गाठला आहे. अशातच शेतातील विहिरीतील मुबलक पाण्याच्या बळावर पेरणी केल्यास व पाऊस लांबणीवर गेल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता आहे.

पेरणी केव्हा करायची?

हवामान खात्याने १ जून पर्यंत पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे काही दिवसात विविध पिकांची लागवड करणे शेतकऱ्यांना फायद्याची ठरणार होते. मान्सूनचे आगमन आणि परतीचा पाऊस याची सांगड घालत यंदा पेरणी काहीशी उशिरा केल्यास योग्य ठरेल. यामुळे शेतकरी दमदार पावसाची वाट बघत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT