Akola Crime News sakal
अकोला

Akola Crime News: उद्योजकाची ५० लाखाने फसवणूक; गुन्हा दाखल

युनियन बँक ऑफ इंडियाच्या या बँक खात्याचे शर्मा इंटरप्राईजेसचे खातेधारक

सकाळ वृत्तसेवा

Akola Crime News: जुने शहर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाळापूर रोडवरील पारस्कर शोरुमचे संचालक व प्रसिद्ध उद्योजक विवेक रामराव पारस्कर (६२) यांची ५० लाखाने फसवणूक झाली. या प्रकरणी जुने शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केले आहे.

पारस्कर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विनोद कुमार रामदेव मेहता (३१, वर्ष रा. चंदीगड), रेजिना इमर्सन, डॅनी अलास्का, ॲडम बोल, मोनिका शर्मा (रा. नागालँड) या आरोपींनी त्यांची ४९ लाख ९० हजार रुपायंनी फसवणूक केली. ता. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी पारस्कर यांनी ही तक्रार दिली होती. त्याची चौकशी सहायक पोलिस निरीक्षक विशाल नांदे यांनी केली.

शर्मा इंटरप्राईजेस या नावांने असलेल्या बँक खात्यात पारस्कर यांच्याकडून घेण्यात आलेली रक्कम जमा झाल्याचे आढळून आले.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या या बँक खात्याचे शर्मा इंटरप्राईजेसचे खातेधारक बिनोद रामकुमार मेहता हे असल्याचे दिसून आले.

आरोपीने फिर्यादीसोबत मोबाईलद्वारे संपर्क संपर्क साधून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने व्हॉटस् ॲप मेसेज व ईमेलद्वारे मोठमोठे आमिश दाखविले व पारस्करांचा विश्वास संपादन केला व वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण ४९ लाख ९० हजार रुपये भरण्यास प्रवृत्त केले.

त्यानंतर अर्जदार यांचे सोबत संपर्क करणे बंद केले. त्यावरून पारस्कर यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेत फसवणूक झाल्याची तक्रार दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT