Ganesh Chaturthi 2022
Ganesh Chaturthi 2022 sakal
अकोला

Ganeshotsav 2022 : पानवालेंची पाचवी पिढी जोपासते गणपतीची परंपरा

सकाळ वृत्तसेवा

वाडेगाव : प्रणम्यं शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम ।भक्तावासं: स्मरैनित्यंमायु:कामार्थसिद्धये ॥नारद पुरायणातील गणपतीच्या या संकटनाशक स्त्रोत्राप्रमाणे एखाद्या कार्याची सुरुवात गणेश पुजनाने केल्यास ते कार्य सिद्धीस जाते. त्याप्रमाणे पातूर तालुक्यातील पानलावे कुटुंबाने वाडेगाव येथे सव्वाशे वर्षांपूर्वी सुरू केलेल्या गणेशोत्सवाची परंपरा या कुटुंबातील पाचवी पिढी आजही त्याच मानाने जोपासत आहे.

सन १८९२ मध्ये पुण्यात भाऊसाहेब रंगारी यांनी प्रथम गणेशोत्सव साजरा केला. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सन १८९४ मध्ये गणेश स्थापनेला सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप दिले. तेव्हापासून सर्वत्र मोठ्या उत्साहाने तसेच भक्ती भावाच्या वातावरणात गणेश उत्सव साजरा करण्यात येत आहे. लोकमान्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत पानलावे कुटुंबाने वाडेगाव येथे या उत्सवाला सुरुवात केली. तेव्हापासून गणेश स्थापनेची परंपरा निरंतर जोपासली जात आहे. वाडेगाव येथिल गणेश उत्सव पंचक्रोशीत परिचित आहे.

स्वतःच्या हाताने तयार करीत होते मूर्ती

वाडेगावच्या मानाच्या गणपतींची परंपरा पातूर तालुक्यातील तांदळी येथिल पानवाले कुटुंबाची पाचवी पिढी जोपासत आहे. या परंपरेला पानवाले कुटुंबातील महादेव रामचंद्र पानवाले यांनी प्रारंभ केला होता. प्रारंभीच्या कालावधित जवळपास गणपतीची मूर्ती स्वतःच्या हाताने तयार करून चौदा किलोमीटरचा प्रवास करून डोक्यावर आणून वाडेगाव येथिल बाजार रोडवर असलेल्या हनुमान मंदीरात स्थापना करण्यात येत होती. याच कुटुंबातील बजरंग महादेव पानवाले व नंतर त्यांचे चिरंजीव अजय तसेच सूरज पानवाले आजही ही परंपरा मनोभावे जोपासत आहेत.

विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान

पानवाले कुटुंबातील सदस्य गणेश स्थापनेपासून विसर्जनापर्यंत मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करतात. विसर्जन मिरवणुकीत पहिल्या क्रमांकाचा मान त्यांच्या गणपतीला मिळतो. मानाच्या गणपतींच्या मूर्तीची सस्ती वेशित गावातील शांतता समितीचे सदस्य, पोलिस अधिकारी यांच्या कडून पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujrat Video: 'माझ्या बापाची EVM आहे'; भाजप नेत्याचा मुलाने मतदान केंद्रातूनच केलं इन्स्टाग्राम लाईव्ह

Jobs: 2024मध्ये जवळपास 50 टक्के कर्मचारी नोकरी सोडण्याच्या तयारीत; काय आहे कारण?

Hardik Pandya : हंगामातील खराब कामगिरीनंतर हार्दिकबाबत MI मॅनेजमेंट घेणार मोठा निर्णय? कामकाजावर सिनियर खेळाडूंचीही नाराजी

Sheetal Mhatre : ''खासदारकीसाठी तुम्ही दावोसच्या गुलाबी थंडीत काय केलंत?'', शीतल म्हात्रेंचा रोख कुणाकडे?

Sharad Pawar: 'मी असं बोललेलो नाही'; शरद पवारांचे प्रादेशिक पक्षांबाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT