Akola Crime News esakal
अकोला

Akola Crime News: शासकीय योजनांचा लाभ देतो सांगून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस तक्रारी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Akola Crime News : तुम्ही वृद्ध असल्याने तुम्हाला शासकीय योजनेतून उपाचार करण्यासाठी लाभ मिळतो,अशी भूलथाप देवून वृद्ध दामप्त्याचे दागिने लुटणाऱ्याला औरंगाबाद येथील भामट्याला अकोला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.

अकोला जुने शहरातील सोनटक्के प्लॉटमध्ये राहणारे शहीदाबी फिरोजोद्दीन (६५) यांनी ता. १ फेब्रुवारी २०२३ रोजी सिटी कोतवाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार त्या ता. १ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजतानंतर पतीसह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात डोळे तपासणीकरिता गेल्या होत्यात.

तेथे एक अनोळखी इसम त्यांच्या जवळ आला व त्याने फिर्यादीला भुलथाप देवून त्यांना सांगितले की, तुम्ही दोघे वयोवृध्द झाले असल्याने शासनाकडून तुम्हाला पैसे मिळणार आहेत. असे सांगुन फिर्यादी व तिच्या पतीला ॲटोने अकोला महानगरपालिकेत आणले.

येथे आणल्यानंतर फिर्यादीला सोन्याचे दागीणे काढून ठेवण्यास सांगितले. फिर्यादीकडील सोन्याचे चांदीचे दागीणे (किमंत ४७ हजार ४७५) व रोख सात हजार ४०० असा एकूण ५४ हजार ८७५ चा मुदमाल घेवून भामट्याने पलायन केले.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिस तक्रारी दिली. त्यावरून गुन्हा दाखल करून सिटी कोतवाली पोलिसांनी तपास सुरू केला.

तपासात आरोपी आसीफ अहेमद खान खलील अहेमद खान (५३, रा. कटकटनगर गल्ली नं २, नेहरूनगर, जिल्हा औरंगाबाद) याला अटक करण्यात आली. आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. आरोपीकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT