shravan bal yojana 
अकोला

अकोला : निराधारांना मिळणार तीन महिन्यांचे मानधन!

५० कोटी ७० लाखांचा निधी प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

अकोला - मानधनाच्या प्रतीक्षेत असलेले निराधार गत तीन महिन्यांपासून मानधनासाठी बॅंक व तहसिल कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. परंतु शासनाकडून अनुदान न मिळाल्याने संबंधितांना घोर निराशेला सामोरे जावे लागत आहे. असे असतानाच शासनाने जिल्ह्यातील निराधारांना मानधन देण्यासाठी ५० कोटी ७० लाख ७३ रुपयांचे अनुदान उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात सदर अनुदान जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उतार वयात निराधारांची होणारी होरपळ थांबवण्यासाठी केंद्र सरकारने त्यांच्यासाठी संजय गांधी निराधार याेजना, श्रावणबाळ सेवा राज्य, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग निवृत्ती वेतन याेजना सुरू केली आहे. याेजनेचा लाभ घेणाऱ्यांना शासनामार्फत पेंशन (मानधन) देण्यात येते. अनुदानाची रकम लाभार्थ्याच्या बॅंक खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे (डीबीटी) जमा करण्यात येते. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एक लाखावर निराधारांना पेंशन (मानधन) देण्यात येते. दरम्यान संबंधित लाभार्थ्यांसाठी मानधन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे अनुदान नसल्याने त्यांना आर्थिक तंगीचा सामना करावा लागला. अखेर राज्य शासनाकडून जिल्ह्यासाठी ५० कोटी ७० लाख ७३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. असे असले तरी इंदिरा गांधी निवृत्ती, विधवा व राष्ट्रीय कुटुंब योजनेच्या अनुदानाची अद्याप प्रतीक्षाच आहे.

एकत्र मिळणार अनुदान

श्रावणबाळ (एसटी) व संजय गांधी (एसटी) या दोन योजनेचे एप्रिल महिन्याचे अनुदान प्राप्त झाले आहे. उर्वरित संजय गांधी (एससी, सामान्य) व श्रावणबाळ एससी, सामान्य) यांना एप्रिल ते जून पर्यंतचे अनुदान एकत्रित मिळणार आहे. विशेष म्हणजे राज्य शासनाकडून जुलै महिन्याचे सुद्धा अनुदान जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहे.

अशी आहे लाभार्थ्यांची संख्या

तालुका लाभार्थी संख्या

अकोला ४२९७४

अकोट १८७७३

तेल्हारा ११९४७

पातूर ९२९२

बाळापूर १३४१३

मूर्तिजापूर १९८७६

बार्शीटाकळी ९१०१

एकूण १२५३७६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA 3rd ODI: विराट कोहलीमुळे उडाला गोंधळ; Vizag मध्ये नेमकं काय घडलं? पोलिसांची दमछाक अन्...

Vladimir Putin Interview : रशियाने खरंच मोदींच्या हत्येचा कट उधळला? 'त्यादिवशी' कारमध्ये काय चर्चा झाली? पडद्यामागची गोष्ट समोर...

Marathi Breaking News LIVE: पुणे विमानतळावर विमान सेवेला मोठा फटका

Putin India visit: पुतीन यांच्या स्वागताला मुंबईचा पांढरा हत्ती! मोदींनी का निवडली टोयोटा फॉर्च्यूनर?

Viral Video: 'माझ्या बॉसला सांगा की मला कामावरून काढून टाकू नका', Indigo चं उड्डाणं रद्द झाल्यावर विमानतळावरील प्रवाशांचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT