Akola heavy rain crop damage sakal
अकोला

Akola : ४४ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत!

एक लाख २० हजार शेतकऱ्यांपैकी ७६ हजार शेतकऱ्यांची दिवाळी गोड!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जून ते जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी शासनाकडून १३४ कोटी २९ लाख रुपयांचा निधी मिळाला आहे. सदर निधीचे वितरण तालुकास्तरावर सुरु असून २३ ऑक्टोबरपर्यंत एक लाख २० हजार १८८ शेतकऱ्यांपैकी केवळ ७६ हजार १९२ शेतकऱ्यांच्या खात्यातच अतिवृष्टीची मदत जमा झाली आहे, तर ४३ हजार ९९६ शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळाली नाही. त्यामुळे मदत रक्कम मिळालेल्या शेतकऱ्यांचीच दिवाळी गोड झाल्याचे दिसून येत आहे.

जून, जुलै महिन्यात जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. बाळापूर व अकोला तालुक्यात पावसामुळे शेतीचे सर्वाधिक नुकसान झाले. शेती पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, ज्वारी, मूंग, उडीद, भाजीपाला या पिकांना अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला. परिणामी शेती पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक त्यानंतर अंतिम अहवाल तयार करून शासनाला पाठवण्यात आला होता. त्यानुसार शासनाने शेती नुकसानीसाठी निधी मंजूर केला आहे.

सदर निधी जिल्ह्याला प्राप्त झाल्यानंतर निधी तहसिलदारांच्या खात्यात वर्ग करण्यात आला. परंतु त्यानंतर जवळपास एक आठवडा सदर निधीचे वितरण रखडले होते. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात मदत निधी जमा करण्यास सुरुवात झाली आहे.

परंतु अद्यापही एक लाख २० हजार १८८ शेतकऱ्यांपैकी ७६ हजार १९२ शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात मदत जमा झाली नाही. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर संबंधित शेतकरी मदतीची आस लावून बसले.

असे केले मदतीचे वाटप

  • तालुका शेतकरी संख्या रक्कम

  • अकोला १४८७५ १५ कोटी ४२ लाख

  • बार्शीटाकळी ७१३३ ३ कोटी ६५ लाख ८ हजार

  • अकोट १२४५८ १४ कोटी ९९ लाख ३५ हजार

  • तेल्हारा ३४५२ २ कोटी ९ लाख २८ हजार

  • बाळापूर ३३९४० ४० कोटी २६ लाख ७ हजार

  • मूर्तिजापूर ४३३४ २ कोटी ६८ लाख ७३ हजार

  • पातूर ४९ ३ लाख ३४

असे झाले होते नुकसान

जून, जुलै व ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातील १ लाख ४ हजार ८८८ शेतकऱ्यांचे एकूण ९ हजार ६६५.२९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी १२३ कोटी ६२ लाख ८८ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत. त्यामध्ये जिरायती क्षेत्र, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे.

वाटपाची टक्केवारी ५८.९१

जिल्ह्यातील मदत वाटपाची एकूण टक्केवारी ५८.९१ आहे. त्यामध्ये अकोला तालुका ३२.८९, बार्शीटाकळी ३३.३१, अकोट ७५.९१, तेल्हारा ८२.६१, बाळापूर ७९.६६, मूर्तिजापूर ७४.३२, पातूर तालुक्यात ९२.२७ टक्के मदतीचे वाटप दिवाळीपूर्वी करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT