Akola Cotton Crop Damage  
अकोला

Akola : कपाशीवर लाल्या; शेतकरी चिंतेत!

अतिवृष्टीनंतर कपाशीवर आता नवे संकट; तेल्हारा तालुक्यासह जिल्ह्यातील शेतकरी धास्तावला

सकाळ वृत्तसेवा

तेल्हारा : तालुक्यात अति पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीन पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले. त्यामधून कसेबसे सावरत नाही तोच कपाशीवर ‘लाल्या’ रोगाने हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या उरल्यासुरल्या आशाही संपल्या आहेत. आधीच परतीच्या पावसाने घातलेल्या थैमानामुळे शेतकरी हतबल झाला आहे. त्यात ‘लाल्या’ने भर टाकल्यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंतेत पडला आहे.

तेल्हारा तालुक्यात बागायती कापसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. यंदा सुरुवातीला थोडाफार पाऊस आल्याने शेतकऱ्यांनी मूग, उडीद, सोयाबीन पिकांची पेरणी केली; मात्र परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आता कपाशीवर ‘लाल्या’ आल्याने आता जगावे की, मरावे?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सततच्या पावसामुळे एक दाणाही शेतकऱ्यांचे घरात आला नाही. दिवाळी सारखा सणही शेतकऱ्यांचा अंधार गेला. सोयाबीन पिकांवर आशा धरून बसलेल्या शेतकऱ्यांचे स्वप्नावर परतीच्या पावसाने घात केला. झालेल्या नुकसानीची कसर पावसाळी कपाशीवर काढावी अशा विचारात शेतकरी असतानाच ‘लाल्या’ने त्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले.

आता कुटुंबाचा उदर्निवाह कसा करायचा, मुलाबाळांचे शिक्षण, सुख-दुःख, बॅंकेचे कर्ज कसे भरायचे, असे अनेक प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर ‘आ’ करून उभे आहेत. मशागतीसाठी लागलेला खर्च व सध्याची परिस्थिती पाहता तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही शासनाने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत नाही.

तालुक्यातील आणेवारी ५० टक्केच्या आत नाही. एवढ्या मोठ्या नुकसान असताना शेताकऱ्यांना मदतीला धावून कोणी येत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मानसिक मनोबल खचले आहे. आता जगावे की, मरावे असा प्रश्न उपस्थित होते आहे. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये यासाठी विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करत आहे.

परंतु, तेल्हारा तालुक्यात तसे चित्र दिसत नाही. मतासाठी घरोघरी भिक मागणारे लोकप्रतिनिधी मात्र सध्या तालुक्यात कोठेही दिसत नाही. केवळ मतांसाठी काहीही करणारे आता कुठ गायब झाले?, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्याचे सरकारला शेतकऱ्यांचे देणंघेणं नाही. तालुक्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मूग, उडीद, सोयाबीन पीक हाताचे गेले. आता कपाशीवर ‘लाल्या’ आल्याने कपाशी पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. लोकप्रतिनिधिंना सध्या तरी शेतकऱ्यांचे काहीच देण-घेण नाही. शासनाने शेतकऱ्यांना एकरी सरसकट ५० हजार रुपये मदत करावी.

- शाम भोपळे, माजी अध्यक्ष, काँग्रेस कमेटी, तेल्हारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT