शॉक लागून दोघांचा मृत्‍यू sakal
अकोला

Akola News : कूलरचा शॉक लागून पती-पत्‍नी ठार; महान येथील पाटीलपुऱ्यातील घटना; सर्वत्र हळ हळ

महान येथील पाटीलपुऱ्यातील घटना; सर्वत्र हळ हळ

सकाळ वृत्तसेवा

महान : घरामधील कुलरमध्ये विद्धुत शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली आहे. स्थानिक महान येथील रहिवासी प्रभाकर बाप्पुराव जनोरकार (७० वर्ष) व त्यांची पत्नी निर्मला प्रभाकर जानोरकार (६५ वर्ष) हे पाटील पुऱ्यात वास्तविक होते. ३० जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभाकर जानोरकार हे शेतातून काम करून घरी परतले असता त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले.

खिडकीतून डोकावून पाहले असता त्यांची पत्नी कुलरच्या पाठीमागे खाली पडलेली त्यांना दिसली. यावरून त्यांच्या पत्नीला नेहमी चक्करचा आजार असल्याने तिला चक्कर आल्यामुळे ती खाली पडली असावी, असा विचार त्यांच्या मनात आल्याने त्यांनी उदय जानोरकार आणि आशिष पोफळे यांच्या मदतीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.

दरवाजा तुटत नसल्याने त्यांनी घरामागील दरवाज्यामधून आत प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कुलरच्या समोरून जात असताना त्यांच्या हाताचा स्पर्श कुलरला झाल्याने ते सुद्धा कुलरला चिटकले आणि जोराने ओरडा केला.

खिडकीतून पाहत असलेले आशिष पोफले आणि उदय जानोरकार यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी घराबाहेरील मिटरवर काट्या मारल्या परंतु, वीजप्रवाह खंडित झाला नाही. शेवटी सर्व्हिसलाइनवर काट्या मारल्याने वीजप्रवाह बंद झाला. त्यानंतर प्रभाकर जानोरकार हे कुलरच्या पाण्याच्या टपाकडे फेकल्या गेले. उपस्थित नागरिकांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला असता तोपर्यंत ते दोघेही ठार झाले होते.

मृतक निर्मला जानोरकार यांच्या उजव्या हाताला शॉक लागल्यासारखा जळलेले दिसले. त्यांना दुपारच्या वेळेस शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या शरीरावरून दिसून येत असल्याचे बोलल्या जात आहे. मृतकाचे पती प्रभाकर जानोरकार यांच्याकडे दोन एक्कर शेत असून, त्यांना एकही अपत्ये नाही.

दोघे पती पत्नी त्यांच्या दोन एकर शेतीवरच त्यांचा जीवनाचा चालवायचे. आज घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रभाकर जानोरकार हे शेतामध्ये गेले होते. सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ते घरी परतले होते.

कुलरपासून शॉक लागल्याने कुलर जमिनीवर उलटे पडलेले दिसून आले. हे दोघे पती पत्नी मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या निधनाने संपूर्ण महान गावात शोककळा पसरली असून, हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच ठाणेदार राहुल वाघ, पी.एस.आय. बंडू मेश्राम, महान पोलिस चौकीचे जमादार बेलूरकर व त्यांचे सहकारी घटनास्थळावर पोहचले. मृतकांचा पंचनामा करून शवविच्छेदनाकरिता मूर्तिजापूर रुग्णालयात पाठविले. या प्रकरणी मर्गचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : कमीत कमी प्रदूषण अन् शक्य तितक्या पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करू : मुख्यमंत्री फडणवीस

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT