वॉकेथॉन sakal
अकोला

Akola : अकोलेकरांनी अनुभवला वॉकेथॉनचा अभूतपूर्व सोहळा

आयएमएच्या स्पर्धेत शेकडो स्पर्धकांचा सहभाग; पायी चालण्याचा दिला संदेश

सकाळ वृत्तसेवा

अकोला : इंडियन मेडिकल असोसिएशन अकोला (आयएमए) आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकेथॉन स्पर्धेत शेकडो अकोलेकरांनी सहभागी होऊन पायी चालण्याचा संदेश दिले.

वसंत देसाई क्रीडांगण येथून रविवारी सकळी वॉकेथॉनला सुरुवात झाली. प्रमुख अतिथी म्हणून अर्जुन पुरस्कार विजेता कृपाशंकर पटेल उपस्‍थित होते. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, ज्योती कोठारी, जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट, माजी आमदार डॉ. रणजित पाटील आणि इतर मान्यवरांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली.

दहा किलोमीटरच्या स्पर्धेत पोलिस अधीक्षक यांनी सहभाग घेतला. आयएमए अध्यक्ष डॉ. अनुप कोठारी, ओझोन हॉस्पिटलचे संचालक डॉ. विनीत हिंगणकर, अकोला अर्बन कॉपरेटिव बँकेचे रामेश्वर फुंडकर यांनी पाच किलोमीटरच्या वॉकेथॉनला हिरवी झेंडी दाखवली. तीन किमी अंतराच्या वॉकेथॉनला आयएमए अकोलाचे सचिव डॉ. भूपेश पारडकर, डॉ. किशोर पाचकोर, डॉ. तेजस वाघेला, डॉ. राहुल पिंगळे, प्रा. डॉ. सतिश हुशे, डॉ सुनील बिहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवली.

दिव्यांगांसाठी दीड किलोमीटरची वेगळी स्पर्धा आयोजित केली होती. त्याला हिरवी झंडी डॉ. रणजित देशमुख, डॉ. आशुतोष डाबरे, स्वप्निल मोर, अनंतराव खेळकर, निलेश देव इत्यादी मान्यवरांनी दाखवली. वसंत देसाई स्टेडियममधून स्पर्धांना रंगारंग सुरुवात होऊन समारोप आठ वाजताच्या दरम्यान झाला. सर्व स्पर्धकांना पदक देऊन गौरविण्यात आले.

आरटीओ कार्यालयाचा सेल्फी पॉईंट

वसंत देसाई स्टेडियम येथे आयोजित वॉकेथॉन स्पर्धेच्या ठिकाणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने सहभाग घेतला.

या कार्यालयाचा सेल्पी पॉईंट आकर्षणाचा केंद्र ठरला. वॉकेथॉनमध्ये सहभागी असलेल्या जवळपास दोन हजार नागरिकांना, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. जयश्री दुतोंडे यांची स्वलिखित रस्ता सुरक्षा प्रतिज्ञा दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rakhi Price Hike Viral Video : राखी खरेदीआधी एकदा हा व्हिडिओ नक्की बघा; काही सेकंदातच दोन रुपयांची राखी झाली ५० रुपयांना!

Mumbai Crime: मुंबईत प्रियकरासोबत लॉजवर गेली, शरीरसंबंध ठेवताना गुप्तांगाला दुखापत; सत्य लपवण्यासाठी तरुणीचा भलताच कारनामा

Numerology 2025 : 'या' जन्मतारखेवर जन्मलेल्या मुली असतात जोडीदारासाठी लकी ! लग्नानंतर उजळतं जोडीदाराचं भाग्य

Pune News: बारामतीत हुतात्मा स्तंभाचे स्थलांतर करण्यास स्वातंत्र्यसैनिक संघटनेचा विरोध

Amit Shah : वोटबँकेचं राजकारण बंद करा, सुरुवात नेहरुंनी केली होती!....राहुल गांधींच्या आरोपांना अमित शहांचं प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT