वाडेगाव : दिवसेंदिवस उष्णतेत मोठी वाढ होत असल्याचे पाहवयास मिळत आहे. उन्हापासून आपला बचाव कसा करावा याचे नियोजन सामान्य व्यक्तीसोबतच शेतकरी आपल्या शेतातील पीक कसे वाचवता येणार याकडे जास्त लक्ष देत आहे. परंतु, तरी देखील उत्पन्नात मोठी घट होत आहे. उत्पन्न होत नसल्याने आजरोजी लिंबू पिकाची बाजारात आवक कमी झाल्याचे चित्र आजरोजी पाहवयास मिळत आहे.
विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात लिंबू पिकांचे माहेरघर म्हणून बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिचित आहे. परिसरात बागाईत क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून, बाळापूर सह नजीकच असलेल्या पातुरातही बहुतांश शेतकऱ्यांनी लिंबू पिकाची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यात लिंबूचा वापर अधिक केला जातो, त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत लिंबू मागणीच्या तुलनेत बाजारात आवक मोठ्या प्रमाणात घसरली आहे.
यामध्ये जानेवारी, फेब्रुवारीत लिंबू फुलोरा अवस्थेत असताना निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे, तसेच पडलेल्या धुक्यामुळे फुलोरा अवस्थेत असलेले लिंबू व फुलोरा जळाल्याने लिंबू फळांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात विरळपण निर्माण झाला. मार्चमध्ये वाढलेल्या तापमाणामुले लिंबूच्या आकारात योग्य प्रमाणात होत नसलेल्या वाढीमुळे उत्पादनात प्रचंड घट निर्माण झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे.
वाडेगाव येथे दैनंदिन भरणाऱ्या लिंबू बाजारपेठेत स्थानिक परिसरातील, पातूर, बाळापूर तालुक्यातील लिंबू उत्पादक शेतकरी आपले लिंबू पाठवतात. गतवर्षी याच कालावधीत येथील बाजारपेठेत जवळपास १५ हजार कट्टे आवक झाली असल्याची माहिती आहे. परंतु, यंदा सध्याच्या परिस्थितीत आवक प्रचंड घसरली असून, जवळपास अडीच ते तीन हजार कट्टे लिंबू आवक असल्याची माहिती मिळाली आहे.
येथील बाजारपेठेतील लिंबू राज्यातील मुख्य बाजारपेठेत पोहोचतात. लिंबू पिकामुळेच वाडेगाव लिंबूचे माहेरघर म्हणून नावारूपाला आले. बहुतांश शेतकरी बांधवांचे वर्षाभराचे आर्थिक नियोजन याच कालावधीत मिळणाऱ्या लिंबू पिकांच्या उत्पादनावर अवलंबून असते. परंतु, झाडांना लिंबू नसल्याने लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
लिंबू शेतीची आवश्यकतेनुसार मशागत करून सुद्धा निसर्गाच्या अवकृपेमुळे झाडांना लिंबूची फळधारणा अत्यंत कमी प्रमाणात झाली आहे. त्यामुळे उत्पादनात घट निर्माण झाली.
- प्रवीण लोखंडे, लिंबू उत्पादक शेतकरी.
लिंबू बाजारपेठेत गतवर्षीच्या तुलनेत यंदा लिंबूची आवक कमी झाली आहे. लिंबू पिकांची प्रतवारी सुद्धा घसरली आहे.
- शिवानंद हुशे, लिंबू अडत दुकानदार.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.