Akola Kolhapuri dam water  sakal
अकोला

अकाेला : कोल्हापुरी बंधाऱ्याने शेती पाणीदार

मंगरुळपीर तालुक्यात बंधाऱ्यांची संख्या २२, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

शरद येवले

मंगरुळपीर : यावर्षीच्या पावसाळ्यात मृद व जलसंधारण विभागाच्या कोल्हापुरी बंधाऱ्यांमध्ये अडवण्यात आलेल्या पाण्यामुळे तालुक्यातील हजारो हेक्‍टर क्षेत्र प्रत्यक्ष ओलिताखाली येणार आहे. तसेच पाझर तलाव आणि गावतलावांत साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरींच्या जलस्तरात वाढ होऊन हजारो हेक्‍टर क्षेत्र ओलिताखाली आणण्यासाठी फायदा होणार आहे, अशी माहिती येथील मृद व जलसंधारण विभागाने दिली आहे.

मंगरुळपीर तालुक्यात यावर्षी परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बंधारे आणि तलावांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. मृद व जलसंधारण विभागाने मंगरुळपीर तालुक्यात आतापर्यंत २२ द्वारयुक्त कोल्हापुरी बंधारे बांधण्यात आले आहेत. यापैकी सर्वच बंधाऱ्यांत पाणी अडवण्यात आले आहे. यांची सहा हजार हेक्‍टर सिंचन क्षमता आहे. यापैकी यंदाच्या पावसाळ्यात पाणी साठले असून, शेतकऱ्यांची शेतजमीन प्रत्यक्षात ओलिताखाली येणार आहे.

गाव तलाव व पाझर तलाव, सिमेंट बंधाऱ्यांमधून थेट सिंचनासाठी फायदा होत नाही; मात्र यामुळे परिसरातील विहिरीतील पाणीपातळी वाढून अप्रत्यक्षरीत्या सिंचनासाठी फायदा होत असतो. गावतलाव व पाझर तलावांची सिंचन क्षमता जरी कमी असली तरी कोल्हापुरी बंधाऱ्यातून ६ हजार ५८७ हेक्‍टर क्षेत्राच्या सिंचनाची सोय होणार आहे. तालुक्यातील कोल्हापुरी बंधाऱ्यांपैकी सर्वच बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यात आलेले आहे.

मंगरुळपीर तालुक्यातील अढाण नदीवर शेलुबाजार, ईचा, नागी, तपोवन, तऱ्हाळा या भागातील द्वारयुक्त कोल्हापुरी बंधारे बांधून पूर्ण झाले असून परिणामी, यंदाच्या पावसाळ्यात इथे तीनशे घनमीटर पाणी साठले आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर सिंचन क्षमता निर्माण झाली असून अनेक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार असल्याचे मंगरुळपीर येथील मृद व जलसंधारण विभागाचे उपविभागीय अभियंता वाघमारे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT