Akola Lockdown in lockdown will cost more! Complaints have increased, now action will be taken 
अकोला

लॉकडाउनमध्ये वेतन रोखने पडेल महागात!, तक्रारी वाढल्या, आता कारवाई होणार

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जवळपास २३ मार्चपासून राज्यभरातील शाळा बंद आहेत. केंद्र व राज्य सरकारने घोषीत केलेल्या लॉकडाउनला चाकरमान्यांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र, असे असले तरी राज्यातील खासगी विना अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना नियमित वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. याची शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून गांभीर्याने दखल घेण्यात आली असून संबंधित शाळांवर कारवाई करण्याचे आदेश प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकाना देण्यात आले आहेत.

राज्यातील करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सर्वच व्यवस्थापनाच्या शाळा 23 मार्च पासून बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या परिस्थितीत खासगी विनाअनुदानित शाळांमधील कार्यरत शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यास शाळा व्यवस्थापनाकडून टाळाटाळ करण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांकडून फी मिळाली नाही तर वेतन देणार कोठून?
काही जणांना तर वर्षानुवर्षे वेतनच देण्यात येत नसल्याची बाबही उघडकीस आलेली आहे. विद्यार्थ्यांकडे फी थकलेली असून लॉकडाऊनमुळे ती वसूल करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. फी वसूल झाली नाही तर शिक्षकांना वेतन देणार कोठून असा प्रश्‍न शाळांकडून उपस्थित करण्यात येऊ लागला आहे.

दरम्यान, वेतन न मिळाल्यामुळे शिक्षक, कर्मचाऱ्यांना कुटुबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या आर्थिक अडचणी येऊ लागलेल्या आहेत. या शाळांमधील शिक्षक, कर्मचारी यांच्या वेतनाची जबाबदारी जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची असताना ही जबाबदारी शासनाची आहे असे म्हणत गैरसमज पसरविण्यात येत आहेत. या शिक्षक, कर्मचाऱ्यांना नियमित वेतन अदा करण्याबात सर्व शाळा व्यवस्थापनांना सूचना देण्याचे निर्देश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.

राज्यातील मान्यताप्राप्त खासगी विनाअनुदानित शाळांना शासनाचे कायदे व नियमावली लागू आहेत. त्यानुसार कोणत्याही शाळेतील शिक्षक, कर्मचारी यांना वेतन व भत्ते, सेवानिवृत्तीनंतरचे व इतर लाभ देणे तरतूदीनुसार देणे अपेक्षित आहेत. मात्र सर्वच शाळांकडून त्याचे पालन होतेच असे नाही. शिक्षक, कर्मचारी यांना कमी लाभ दिले जात असतील तर शिक्षण संचालकांनी शाळांना लेखी आदेश देण्याची तरतूदही करण्यात आलेली आहे. लेखी आदेश दिल्यानंतरही संबंधित शाळा व्यवस्थापनाने कुचराई केल्यास शाळा व्यवस्थापनांची सुनावणी घेऊन शाळांची मान्यता रद्द करण्याचीही तरतूद आहे.

...तर शाळांची मान्यता काढून घेण्यात येईल
शिक्षक, कर्मचारी यांना नियमित वेतन मिळत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास शाळांची मान्यता काढून घेण्याची कार्यवाही करण्याबाबत भूमिका घ्यावी व त्याबाबत शाळा व्यवस्थापनास आवश्‍यक निर्देश देण्यात यावेत, असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India T20 World Cup 2026 Squad Announce : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघाची घोषणा; शुभमन गिलचा पत्ता कट, उप कर्णधार बदलला; इशान किशनही परतला

Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला काय करावं अन् काय करू नये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Bangladesh violence : बांगलादेशमध्ये काहीतरी मोठं घडणार? भारताची चिंता वाढली; अमेरिकेनं नागरिकांना दिल्या अलर्ट राहण्याच्या सूचना

VIDEO : संतापजनक कृत्य! रस्त्यावर खेळणाऱ्या चिमुकल्याला फुटबॉलसारखी मारली लाथ; व्हिडिओ पाहून येईल चीड, डोळ्याजवळ गंभीर दुखापत

Shivaji University Protest Violence : ब्रेकिंग! शिवाजी विद्यापीठात एबीव्हीपीच्या आंदोलनाला हिंसक वळण; पोलिस-विद्यार्थींमध्ये झटापट, घटनेचा व्हिडिओ व्हायरल...

SCROLL FOR NEXT