Akola locks down farmers for kharif season, Laborers returning from the city to cultivate agriculture .. Still wage rates skyrocket ..! 
अकोला

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना लॉकडाउन पावला, शहरातून परतलेले मजूर शेती मशागतीला.. तरीही मजुरीचे दर गगनाला..!

विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतत लॉकडाउन पाळावा लागत असल्याने शहरातील अनेक उद्योग व्यवसायावर अवकळा प्राप्त झाली आहे. त्यामुळे खेडेगावातून शहराकडे कामानिमित्त स्थलांतरित झालेल्यांची घरवापसी झाल्याने कधी नव्हे असा मजुरवर्ग गावागावात सध्या उपलब्ध झाला आहे. असे असतांना मजुरीचे दर कमी होण्याची चिन्हे अतिशय कमी असल्याने तोट्याच्या शेतीला कोरोनाच्या संक्रमणाने शेवटी बळीराजालाही जास्त मजुरी देण्याच्या प्रकारामुळे तोंडघसी पाडले आहे.


गेल्या चार महिन्यापासून जवळपास महाराष्ट्रातील अनेक महानगरात कोरोना संक्रमणाची साखळी घट्ट होत असल्याने संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाला कडक लॉकडाउनची अंमलबजावणी करावीच लागत आहे.

या लॉकडाउनमुळे छोटे मोठे उद्योग व्यवसाय अडचणीत सापडले असून, कंपन्यात व इतर सर्व क्षेत्रात कमी उपस्थिती गरजेचे असल्याने कंपन्यांनी यातून काढता पाय घेत नोकरवर्ग व मजुरांची कपात केली आहे. असे असताना तसेही जसा जसा वेळ मिळत गेला तसे तसे हे नोकर व मजूरवर्ग परतीच्या मार्गाने घरवापसी परतले असून, शेतीमध्ये राबत आपला चरितार्थ सध्या चालवीत आहेत.चार महिन्याच्या प्रतीक्षेनंतरही कोरोना बाधितांचा हा आकडा वाढतच चालल्याने शहराकडे जाण्याचा इरादा अनेकांनी सध्या तरी सोडून दिला असून, शेतकऱ्यांच्या साथीला हातभार लावताना त्यांना शहरातील अधिक मजुरीची सवय असल्याने शेतीत पण चांगली रोजदारी मिळावी यासाठी अंगावर(उधडे)काम घेऊन जास्त मजुरी घेण्यावर भर असल्याने अशा प्रकारामुळे मजुरीचे दर वाढविले जात आहेत. त्यामुळे पहिलेच संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाढलेले मजुरीचे दर चिंतेत भर पाडत आहे.

मजुरीचे दर व खताची कमतरता शेतकऱ्यांना सतावतेय
सध्या खरीप हंगामासाठी मजुरांची मुबलकता असतांना मजुरीचे दर मात्र, अजूनही चढेच आहे. पाऊस टप्प्या-टप्प्याने पडत असल्याने आंतरमशागतीला भरपूर वेळ मिळत गेला तरी मजुरीचे दर मात्र कमी होण्याची नाव घेत नसून, एका दिवसाला 'पारगी' दुपारपर्यंत निंदणीचे रुपये तर फवारणी व कोळपणीसाठी याच वेळेसाठी दोनशे ते अडीचशे रुपये शेतकऱ्यांना मजुरीचे द्यावे लागत आहे. पिके सध्या ऐन खतावर आले असतांना रासायनिक खतांची टंचाई भासत असून, युरिया तर दुकानातून हद्दपारच झाला आहे.

(संपादन -  विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT