Akola Manora News Controversy over donation box, One maharaja killed another maharaja 
अकोला

खळबळजनक: एका महाराजाने केला दुसऱ्या महाराजांचा खून, काय असेल कारण

सकाळ वृत्तसेेवा

मानोरा (जि.वाशीम) : बंजारा समाजाची काशी म्हणून ख्यात श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील सामकीमाता संस्थानचे वारसदार यांच्यात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत पंजाब उत्तमराव महाराज यांचा बुधवारी (ता.१) खून झाल्याची घटना घडली. मृतकाचा पुतण्या राहुल अजाबराव राठोड यांनी मानोरा पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीमुळे आरोपी दिलीप शेषराव महाराज, सचिन उल्हास महाराज, सुनील उल्हास महाराज, पवन दिलीप महाराज यांचे विरूध्द गुन्हा दाखल करून चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.


पोलिस सूत्रांकडून प्राप्त माहिती नुसार, मानोरा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या श्रीक्षेत्र उमरी खुर्द येथील सामकीमाता मंदिरात १ सप्टेंबरला पोर्णिमा असल्याने भाविक मंदिरात दर्शनाकरिता येतात. सामकीमता मंदिराचा वाद न्यायालयात चालू असल्यामुळे मंदिराचा ताबा कोर्टाकडे आहे.

त्यामुळे भाविक दर्शन करून दान दिलेला पैसा दानपेटीत टाकतात व दान केलेले पैसे कोर्टात जमा केले जातात. १ सप्टेंबरला दुपारी ४.३० वाजता सचिन उल्हास महाराज हा मंदिराच्या दरवाज्याजवळ उभा होता. दरवाजाजवळ ठेवलेले पैसे जमा करीत होता. राहुल याने मंदिरात थांबू नको, असे म्हटल्यावर शिवीगाळ केली. तोंडावर व डोक्यावर बुकीने मारून तेथून निघून गेला. त्यावेळी फिर्यादी सुध्दा घरी निघून गेला.

लगेच सचिन उल्हास महाराज लोखंडी रॉड हातात घेऊन आला. त्याचे सोबत दिलीप शेषराव महाराज, सुनील उल्हास महाराज व पवन दिलीप महाराज हातात काठी घेरून फिर्यादीच्या घरासमोर आले. तेवढ्यात फिर्यादीची आई सुमन अजाबराव राठोड हिने फिर्यादीला घरात बंद करून बाहेरून कडी लाऊन घेतली.

फिर्यादीचे मोठे बाबा पंजाब उत्तमराव महाराज, भांडण करू नका असे म्हणत असताना सचिन उल्हास महाराज याने लोखंडी रॉडने छातीवर व उजव्या हातावर मारले. फिर्यादीची आई सुमन राठोड मध्ये आली असताना तिला जीवाने मारण्याच्या उद्देशाने सुनील उल्हास महाराज व दिलीप शेषराव महाराज यांनी तिचे खांद्यावर व दोन्ही छातीवर काठीने बेदम मारहाण केली. तिला सोडविण्याकरिता कल्पना राठोड, विकास राठोड आले असता त्यांना पवन दिलीप महाराज याने मारहाण केली.

भांडणाचे आवाज एकून अभिमान दादाराव महाराज घटनास्थळी आले. त्यांना सुद्धा जखमी केले. पंजाब महाराज यांना तातडीने बाळू बिरबल राठोड यांच्या ऑटोमध्ये दिग्रस येथील आरोग्यधाममध्ये उपचारकरिता भरती केले असता उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाल्याने मृतकाचा पुतण्या राहुल आजाबराव महाराज यांनी मानोरा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी दिलीप शेषराव महाराज, सुनील उल्हास महाराज, सुनील उल्हास महाराज, पवन दिलीप महाराज यांचे विरूद्ध कलम ३०२, ३०७, ४५२, ३२३, ३४ भादवी गुन्हा दाखल करून चारही आरोपीना अटक करण्यात आली आहे. घटनेचा तपास ठाणेदार विजय पाटकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक हे करीत आहेत.

पंजाब महाराज यांचेवर पोलिस बंदोबस्तात अंत्यविधी
जुन्या वादातून महाराज कुटुंबियात झालेल्या मारहाणीत पंजाब महाराज यांचा खून झाल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी व अप्पर पोलिस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांना कळताच तत्काळ घटना स्थळाला भेट देऊन कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, गावात क्यु.आर.टी. पथक तैनात करण्यात आले. महाराजांचे शवविच्छेदन झाल्यावर श्रीक्षेत्र उमरी येथे अंत्यविधीकरिता २ सप्टेंबरला कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील, ठाणेदार विजय पाटकर, आसेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिवाजी लष्करे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र नाईक, विष्णु आडे व १५ पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला. अंत्यविधीकरिता मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते. बंजारा काशीत झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : चौथ्या दिवशीही शक्तीपीठाची मोजणी शेतकऱ्यांनी रोखली, पोलिसांसोबत वाद

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT