Akola Marathi News Bird flu positive in two places in Akola district 
अकोला

अकोला जिल्ह्यात दोन ठिकाणी बर्ड फ्लू पॉझिटिव्ह

सकाळ वृत्तसेेवा

अकोला :  बर्ड फ्लू संसर्गाच्या संशयाने जिल्ह्यात आतापर्यंत जिवंत पक्षाचे ३५२ नमुने घेण्यात आले तर मृत पक्षांचे ३० नमुने घेण्यात आले. त्यात १३ पाळीव पक्षी तर १७ जंगली पक्षी आहेत.

आतापर्यंत पाठविलेल्या नमुन्यापैकी फक्त दोनच नमुन्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आतापर्यंत १४ ठिकाणी सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. त्यात आता तेल्हारा तालुक्यातील मनब्दाची भर पडली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावने यांनी दिली आहे.


मनब्दा येथील सुरेश चिमनलाल भायानी यांच्याकडे एक कबुतर मृत आढळले असून, त्या मृत पक्षांचे नमूने घेऊन ते रोग अन्वेषण विभाग पुणे मार्फत राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्था, भोपाळ येथे पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल येईपर्यंत सुरेश चिमनलाल भायानी यांच्या शेतास केंद्रबिंदू मानून १० कि.मी. त्रिज्या परिसर सतर्क क्षेत्र घोषित करण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निर्गमित केले आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live Updates: बनावट नोकरीच्या जाहिरातींविषयी नागपूर मेट्रोचा इशारा

मृत डॉ. शिरीष वळसंगकरांच्या घरातील भांडण पोलिस ठाण्यात! रुग्णालयावरील घरात राहण्यावरून डॉक्टरांचे जावई अन्‌ सून डॉ. शोनाली यांच्यात वाद; सदर बझार पोलिसांत तक्रारी

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : २० जून २०२६ ते २६ जून २०२६ - मराठी राशी भविष्य

Aloo Cheese Thecha Paratha: साधा पराठा विसराल; एकदा खा हा आलू चीज ठेचा पराठा!

आजचे राशिभविष्य - 20 जून 2026

SCROLL FOR NEXT