Akola Marathi News Corona 13 patients positive, 109 patients discharged 
अकोला

कोरोनाचे १३ रुग्ण पॉझिटिव्ह, १०९ रुग्णांना सुटी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून बुधवारी कोरोना संसर्ग तपासणीचे २४३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील २३० अहवाल निगेटीव्ह तर १३ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आज १०९ रुग्ण आजारातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.


बुधवारी दिवसभरात १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत. त्यात सात महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यातील आश्रयनगर येथील तीन, आदर्श कॉलनी व बाबुळगाव येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित जीएमसी हॉस्टेल, काँग्रेस नगर, मुंडगाव, टेलीग्राफ कॉलनी मुकूंद नगर, माधवनगर व दत्ता कॉलनी गोरक्षण रोड येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे.

आज सायंकाळी कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. दरम्यान आज दुपारनंतर आयकॉन हॉस्पिटल येथून तीन, ओझोन हॉस्पिटल येथून एक, हॉटेल स्कायलार्क येथून चार, हॉटेल रिजेन्सी येथून एक तर बिहाडे हॉस्पिटल येथून चार तसेच होम आयसोलेशन मधील ९६, अशा एकूण १०९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली. आता अकोला जिल्ह्यात ३९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३१९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

संपादन - विवेक मेतकर)

 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT