Akola Marathi News First Short Film Festival Competition 
अकोला

अकोल्यात प्रथमच शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धा

सकाळ वृत्तसेेवा

अकोला; छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधत १९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे ऐतिहासिक छत्रपती शॉर्ट फिल्म फेस्टिवल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन पटावर आधारित छत्रपती शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवल स्पर्धेमध्ये जुन्या किंवा नव्या एक मिनिट ते पधरा मिनिटा पर्यंतच्या शॉर्ट फिल्म १४ फेब्रुवारी पर्यंत मागविण्यात आल्या आहेत .

आयोजित स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस ७ हजार रुपये, द्वितीय बक्षीस ५ हजार रुपये, तृतीय बक्षीस ३ हजार रुपये, तसेच एकूण एक हजार रुपयाचे तीन उत्तेजनार्थ बक्षीस ठेवण्यात आले आहेत. 

तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी प्रत्येक स्पर्धकाला प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. वैचारिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अविनाशभाऊ देशमुख यांचे अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या या स्पर्धेचे संयोजक, दिग्दर्शक प्रवीण हटकर,हे राहणार असुन त्यांना प्रतिक वाढोकार, मिहीर अग्रवाल, वैष्णवी देशमुख, सहकार्य करणार आहेत.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजक समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

संपादन - विवेक मेतकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

Pune News : प्रमुख जिल्हा न्यायाधीश मैदानात; दंड भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना केले सहकार्याचे आवाहन

Vishwas Pathak : जीएसटी कमी झाल्याने नागरिक आनंदी; भाजप प्रवक्ते विश्‍वास पाठक

SCROLL FOR NEXT