Akola Marathi News Government warehouse was blown up at half past one in the night
Akola Marathi News Government warehouse was blown up at half past one in the night 
अकोला

रात्रीचे अडीच वाजता सरकारी गोदाम फोडले, चोरांनी काय चोरले वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा

देऊळगाव राजा (जि.बुलडाणा) :  वखार महामंडळाच्या गोडाऊनचे शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी गोडाउन मध्ये साठवलेला ५४ कट्टे हरभरा चोरून केल्याची घटना आज (ता.२५) सकाळी उघडकीस आली याबाबत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला

पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चिखली रोड वरील वखार महामंडळाच्या गोडाऊनमध्ये नाफेड मार्फत खरेदी केलेला हरभरा साठवून ठेवण्यात आला होता सदर शटरचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी गोडाउन मध्ये प्रवेश केला व ५४ कट्टे  हरभरा किंमत सुमारे १ लाख ३० हजार रुपये चोरून नेला.

ही चोरी रात्री अडीच ते पहाटे पाच वाजताच दरम्यान झाली. चोरी झाल्याचे समजल्यावर वखार महामंडळचे साठा अधीक्षक सुनील प्रकाश शिंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल प्रदीप गुंजकर तपास करीत आहेत

मागील वर्षी वखार महामंडळाच्या याच गोडाऊनचे शटर चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी नाफेड क्या हरभऱ्यावर हात साफ केला होता या चोरीचा अद्यापही तपास लागला नाही

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT