Akola Marathi News Lalkanthi Tirchimani, Red Throated Pipit found near Russia for the first time near Kapashi Lake 
अकोला

रशियातून पहिल्यांदाच आली लालकंठी तीरचिमणी, रेड थ्रोटेड पिपिट आढळले कापशीच्या तलावाजवळ

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : रशियात वीण करणारी व मुख्यत्वे अफ्रीका आणि दक्षिण-उत्तर अशियात स्थलांतर करणारी लालकंठी तीरचिमणी कापशी तलावावर पहिल्यांदाच आढळून आली आहे.

स्थलांचराच्या काळात ही चिमणी भारतात काही अवधी विसावा घेण्यासाठी थांबते. ‘रेड थ्रोटेड पिपिट’ (लालकंठी तीरचिमणी) नावाने परिचित असलेल्या या चिमणीची विदर्भातील ही पहिलीच नोंद आहे, हे विशेष.

हेही वाचा - चालत्या बसमध्ये महिलेला अचानक सुरू झाल्या प्रसुतीकळा, कंडक्टरच्या लक्षात येताच


पक्षीमित्र व अभ्यासक समिश धोंगळे यांना ३ जानेवारी रोजी कापशी तलावावर एक अनवट तीरचिमणी दिसून आली. त्यांनी लगेच तिचे छायाचित्र काढले. ते पडताळून बघितले असता ती लाल कंठाची तीरचिमणी असल्याचे लक्षात आले. पक्षी अभ्यासक निनाद अभंग यांनी या तीरचिमणीची विदर्भातील ही पहिलीच व दुर्मिळ नोंद असल्याची पुष्टी केली आहे. ही नोंद विदर्भासाठी मोठी असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

कापशी जलाशयावर नेहमी पक्ष्यांची गर्दी असते. मात्र, यंदा तलावाच्या खोलीकरणामुळे अन्नसाखळी विस्कटली आहे. त्यामुळे पाणपक्षांनी या तलावाकडे पाठ फिरवलेली दिसून येत आहे. स्थलांतरित पक्षांच्या परतीच्या वेळी म्हणजे मार्च-एप्रिल महिन्यात या जलाशयावर पक्षांची संख्या वाढू शकते, असा आशावाद समिश धोंगळे यांनी व्यक्त केला आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IB ला मिळाले नवे बॉस! काश्मीरमध्ये मोठी जबाबदारी सांभाळलेले IPS महेश दीक्षित आता देशाच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख

Savitribai Phule Pune University: चांगल्या गुणांनंतरही विद्यार्थी ‘नापास’! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा भोंगळ कारभार; ‘बी.कॉम’च्या निकालात घोळ

Latest Marathi News Live Update : चार दिवसांच्या 'अंबुवाची महायोगा'नंतर गुवाहाटीतील कामाख्या मंदिराचे मुख्य द्वार उघडले, भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

FIFA World Cup 2026 मध्ये सर्वात मोठा उलटफेर! इक्वाडोरकडून बलाढ्य जर्मनीचा गेम अन् राष्ट्राध्यक्षांनी थेट सुट्टीच केली जाहीर

Mardi Tragedy: दुर्लक्षामुळे वीज सुरक्षेच्या घोषणा कागदावरच; मार्डी दुर्घटनेतून घेणार का धडा?, निर्ढावलेल्या यंत्रणेवर चाप जरुरीचा

SCROLL FOR NEXT