Akola Marathi News Preparations to start classes 5th to 8th, teachers, staff to be corona test 
अकोला

महानगरपालिकेत वरातीमागून घोडे, प्रशासकीय इमरातीतील अग्निरोधक सिलिंडर बदलले

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  ः महानगरपालिकेवर अग्निशमन विभागाची जबाबदारी आहे. असे असतानाही महानगरपालिकेत वरातीमागून घोडे नाचवले जात असल्याचे दिसून येते आहे. भंडारा येथील शासकीय रुग्णालयातील जळीत कांडानंतर खळबळून जागे झालेल्या मनपा प्रशासनाने अखेर महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील २४ अग्निरोधक सिलिंडर बदलले.

भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य शासनाने संपूर्ण राज्यातील शासकीय, निमशासकीय व खासगी रुग्णालये, कार्यालयांमधील अग्निशमन यंत्रणा तपासणीचे आदेश दिले होते.

ही जबाबदारी प्रामुख्याने जिल्हा प्रशासनासोबतच महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागावरच आहे. मात्र मनपाच्या प्रशासकीय इमारतीतच कालबाह्य झालेली अग्निरोधक सिलिंडर होते.

अखेर प्रशासनाने हे सिलंडर बदलण्याचा आदेश दिला. त्यानुसार गुरुवार, ता. २१ जानेवारीपासून अकोला महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील सर्व व विभागांमधील अग्निरोधक सिलिंडर बदलण्यात आले.

त्यात प्रामुख्याने दस्तऐवज असलेल्या विभागांचा समावेश आहे. याशिवाय महापौर, उपमहापौर कार्यालयासोबतच मुख्य सभागृह, स्थायी समिती सभागृह, आयुक्त व उपायुक्तांची दालणे व इतर विभाग प्रमुखांच्या दालनांचा समावेश आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A : गौतम गंभीर आता काय करणार? इंग्लंड दौऱ्यावर ज्यांना नव्हती दिली संधी, त्यांची ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार खेळी...

Latest Marathi News Updates : बीडमधून बीड - आहिल्यानगर रेल्वे धावली, मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

खरंच जया यांच्यासोबत बिनसल्यामुळे ऐश्वर्या राय वेगळी राहात होती? लोकप्रिय दिग्दर्शक म्हणाले- ती आईच्या घरी जायची पण...

Smriti Mandhana चे ऑस्ट्रेलियाविरुद्ध घोंगावलं वादळ! शतक ठोकत केला मोठा पराक्रम; हरमनप्रीत-मिताली राहिल्यात खूप मागे

Nashik News : 'सेवा पंधरवडा' सुरू: नाशिक विभागात 'पाणंद रस्ते' आणि 'सर्वांसाठी घरे' उपक्रमाला गती!

SCROLL FOR NEXT