Akola Marathi News Schools reopen students parents school teacher corona positive 
अकोला

शाळा उघडल्या पण विद्यार्थी कुठे आहेत? शाळेसाठी केवळ 42 हजार पालकांचीच संमती

सकाळ वृत्तसेवा

अकोला :  कोरोनाच्या सावटात जिल्ह्यातील शाळांमध्ये २३ नोव्हेंबररोजी शैक्षणिक सत्राची पहिली घंटा वाजली होती. त्यानंतर २७ जानेवारीपासून आता वर्ग ५वी ते वर्ग ७वीच्या शाळा सुद्धा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची कमी उपस्थिती असल्याने वर्गात विद्यार्थ्यांची संख्या रोडाल्याचे दिसून आले.

पालकच विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास उत्सुक नसल्यानेही विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी असल्याचे दिसून आले. दरम्यान जिल्ह्यातील ४२ हजार ४६७ विद्यार्थ्यांच्या पालकांनीच त्यांच्या पाल्यांना शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र शिक्षकांकडे दिल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

हेही वाचा - ऐऽऽ शंकरपाळ्या! 'एका चापटीत खाली पाडीन, दुसरी लागू बी देणार नाई', दोघांच्या भांडणाचा व्हिडीओ सुसाट....

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली होती. त्यानुसार जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या एक हजार २५५ शाळांपैकी पहिल्या दिवशी १ हजार २८६ शाळा सुरू झाल्या. पहिल्या दिवशी ८ हजार ७१० विद्यार्थ्यांनीच शाळेत हजेरी लावली. विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून व त्यांचे तापमान मोजून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांनी एक दिवसाआधी वर्गांमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी करून वर्ग स्वच्छ केले होते. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी पालकांच्या संमतीपत्राची आवश्यकता असल्याने केवळ ४२ हजार ४६७ विद्यार्थ्यांनीच पालकांचे संमतीपत्र आणले. त्यामुळे पालकच पाल्यांना शाळेत पाठवण्यास उत्सुक नसल्याचे दिसून येत आहे.

असे आहेत संमती देणारे पालक
जिल्ह्यातील वर्ग पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण १ लाख ४ हजार ८७२ विद्यार्थ्यांपैकी ४२ हजार ४६७ विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांना शाळेमध्ये पाठवण्यास संबंधीचे संमती पत्र शिक्षण विभागाला दिले आहे. त्यामध्ये इयत्ता पाचवीच्या ११ हजार ३५०, सहावीच्या १० हजार ५७२, सातवीच्या दहा हजार ४१८ व आठवीच्या दहा हजार १२७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून मिळाली आहे.

२६ शिक्षक पॉझिटिव्ह
कोरोनाचे सावटात शाळा सुरू करण्यापूर्वी शासनाने शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. त्याअंतर्गत आतापर्यंत ४ हजार ४७१ शिक्षकांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये २६ शिक्षक पॉझिटिव्ह आढळले, तर १ हजार १४२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या तपासण्या करण्यात आल्याने त्यात १ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला.

(संपादन - विवेक मेतकर)

अकोला जिल्ह्यातील बातम्या - क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Krishna River Pollution : कृष्णा नदीसह शेरीनाल्यात फेकल्या मेलेल्या कोंबड्या, सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळ; रात्री दहा ते बारादरम्यान 'स्टिंग ऑपरेशन'

Marathi News Live Updates : काल, आज आणि उद्याही शिवसेना ठाकरेंचीच असेल; काय म्हणाल्या खासदार सुप्रिया सुळे?

JPSC-JSSC घोटाळ्याचा तपास वेगात; दिल्लीतून ISN संचालकाला अटक, ८०० OMR शीटची पडताळणी सुरू

धक्कादायक! उद्यापासून IND vs SL कसोटी मॅच अन् त्यापूर्वी खेळाडूंच्या मारहाणीत श्रीलंकेतील क्रिकेट प्रशिक्षकाचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

'अरे मनमोहना...' फेम आशा काळे आठवतात का? अनेक वर्षांनी आल्या कॅमेरासमोर; अभिनेत्रीला पाहून नेटकरी भारावले

SCROLL FOR NEXT