Akola Marathi News Twelve Daughters perform last rites of father in Washim 
अकोला

बारा मुलींचा पार्थिवाला खांदा, लाडक्या वडिलांना लेकींचा अखेरचा निरोप

सकाळ वृत्तसेवा

मानोरा (जि.वाशीम) : अंत्यसंस्काराच्या पुरुषप्रधान संस्कृतीला मागे टाकत बारा मुलींनी लाडक्या पित्याला साश्रू नयनांनी खांदा दिला. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेंदुरजना (आढाव) गावात अंतिम निरोपाचा हा दु:खद प्रसंग हजारो गावकऱ्यांनी अनुभवला.

ग्रामीण भागात शिक्षणाची पाळेमुळे रुजवणारे दानशूर सखाराम गणपतराव काळे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मुलगा नसल्याची कोणतीही उणीव यावेळी त्यांच्या बारा कन्यांनी भासू दिली नाही.

बारा लेकींकडून पित्याला मुखाग्नी

वाशिम जिल्ह्यातील शेंदुर्जना आढाव येथील सखाराम काळे यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. काळेंना 12 मुली असून, मुलगा नाही. त्यामुळे त्यांच्या मुलींनी पार्थिवाला खांदा देऊन अंत्यविधीसाठी स्मशानभूमीत नेले. त्यानंतर पार्थिवाला अग्नीही मुलींनीच दिला. त्यामुळे पंचक्रोशीत हा कुतुहलाचा विषय ठरला आहे.

शिक्षणाचा वसा देणारे सखाराम काळे
सखाराम काळे यांचा जन्म 14 सप्टेंबर 1934 रोजी मानोरा तालुक्यातील शेंदुरजना येथे सधन कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची ओढ होती. आपले चुलत बंधू नामदेवराव काळे यांच्या सोबतीने ग्रामीण भागात त्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. खेड्यातील मुलांना उच्च शिक्षण गावातच मिळावे, या ध्येयाने ते प्रेरीत होते. आज आप्पास्वामी शिक्षण संस्थेचा होत असलेला लौकीक सखाराम आणि नामदेवराव काळे यांच्या योग्य नियोजनाचे फलितच.

पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा

सखाराम काळे गेल्या काही दिवसांपासून वयोमानापरत्वे आजारी होते. गुरुवारी त्यांचे निधन झाले. शुक्रवारी अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या बारा मुलींनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. पित्याला खांदा देऊन सर्व अंत्यसंस्कारही पार पाडले. पुरुषप्रधान संस्कृतीला फाटा देत या बारा लाडक्या मुलींनी आपल्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. हा प्रसंग पाहून उपस्थितांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्याचं दिसून आलं.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढचे पाच दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता; ठाणे अन् पालघरलाही सतर्कतेचा इशारा

INDW vs AUSW Live: स्मृती मानधना-शफाली वर्मा यांचा वर्ल्ड रेकॉर्ड! हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियासमोर तगडे लक्ष्य

IND vs IRE 2nd T20I : संजू ०, अभिषेक ०... भारतीय संघ संकटात; गोंधळामुळे इशान किशन रन आऊट... JAI MOONDRA पुन्हा चमकला

Vilas Ghule : विलास घुले खून प्रकरणात नवे वळण; दहावा आरोपी लातूरमधून ताब्यात, गुन्ह्यातील स्कॉर्पिओ जप्त

Breaking : बेन स्टोक्सचा धक्कादायक निर्णय! इंग्लंडच्या कर्णधाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जाहीर केली निवृत्ती

SCROLL FOR NEXT