Akola Marathi News washim man died in a car accident rescuing a dog 
अकोला

भीषण अपघात; कुत्र्याला वाचववताना कारचा झाला चुराडा

सकाळ वृत्तसेेवा

वाशीम: नागपूर-मुंबई या महार्गावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 3 जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  अमरावती येथून कामरगावकडे येणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातातएक जण जागीच ठार तर इतर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना नागपूर - मुंबई या महामार्गावरील म्हसला फाट्यानजीक घडली.

कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील अब्दुल अजिज अब्दुल हकीम ( वय 29 वर्षे ) हे आपल्या परिवारासह कारने परत येत असताना म्हसला फाट्यानजीक कुत्रा आडवा आल्यानं त्यांच्या कारचा अपघात घडला. हा अपघात इतका भीषण होता की, यात कारचा चुराडा झाला आहे.

हेही वाचा - 

या कार अपघातात अब्दुल अजीज हे घटनास्थळीच ठार झाले असून अब्दुल अजीम अब्दुल हकीम ( वय 32 वर्षे ),असिया परवीन अब्दुल अजीम ( वय 24 वर्षे )  आणि तीन वर्षीय मुलगा महफुज अब्दुल अजीम हे तिघे गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठीअमरावती येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास धनज पोलीस स्टेशन चे ठाणेदार अनिल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात धनज पोलीस करीत आहेत.

(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ओटीपी न मागताच बाईक पळवली; निर्जनस्थळी नेलं अन्...; मुंबईत रॅपिडो बाईक चालक बनला हैवान, तरुणीनं कशी केली सुटका?

दुष्काळात तेरावा! उड्डाणपुलाचं काम, त्यात बस-ट्रकचा अपघात; वाहतूक कोंडीत अडकले पुणेकर

Prayagraj: प्रयागराजमध्ये गंगा नदीच्या दोन धारेत सिक्स लेन पुलाच्या 'पायाभरणी'चे काम सुरू; अडथळा दूर करण्यासाठी घेतला मोठा निर्णय

Pune Student Attack : पुण्यात धक्कादायक घटना ! क्लास सुरु असताना वर्गमित्रानेच गळा चिरुन विद्यार्थ्याला संपवले; दप्तरात चाकू घेऊन आला अन्...

'ते' पुन्हा आले...! निलेश साबळे आणि भाऊ कदम यांचं झी मराठीवर दमदार कमबॅक, चला हवा येऊ द्या नाहीतर 'या' शोमध्ये दिसणार जोडी

SCROLL FOR NEXT