Akola Marathi News Women Sarpanch elected through lucky draw at Danapur
Akola Marathi News Women Sarpanch elected through lucky draw at Danapur 
अकोला

अजब पध्दत, ईश्वर चिठ्ठीने ठरल्या महिला सरपंच

सकाळ वृत्तसेेवा

अकोला : राज्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालांचं  चित्र आता हळू हळू स्पष्ट होऊ लागलं आहे. या निवडणुकांमध्ये अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे, तर काहींना आपला गड राखण्यात यश आलं आहे. या निकालांमधला एक निकाल अजब पद्धतीने घोषित करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतची निवडणूक गुरुवारी पार पडली. यामधे वंचित बहुजन आघाडी व शिवसेना युतीच्या सपना धम्मपाल वाकोडे यांची ईश्वर चिठ्ठीने निवडून आल्या. यावेळी इशवर चिट्ठी वैष्णवी गणेश घायल या मुलीने काढली.

जिल्ह्यातील ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडीची प्रक्रिया गुरुवारी पार पडली. अकोला तालुक्यातील १८ ग्रामपंचायतमध्येही निवडणूक झाली. त्यातील नऊ सरपंच व उपसरपंच अविरोध निवडून आले असून, उर्वरित नऊ ठिकाणी मतदानाची प्रक्रिया राबविण्यात आली.


अकोला तालुक्यातील १८ ग्रामपंचायतच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक गुरुवारी शांततेत पार पडली.त्यात नऊ ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही पदं अविरोध निवड करण्यात आल्याने मतदानाची गरज पडली नाही. उर्वरित नऊ ग्रामपंचायतमध्ये मात्र मतदानाची प्रक्रिया पूर्ण करून सरपंच व उपसरपंच निवडण्यात आले.

हेही वाचा - जिल्हा बँक निवडणुक; मतदार अज्ञातस्थळी; उमेदवारीचा गुंता कायम

येथे झाली अविरोध निवड
अकोला तालुक्यातील बोरगाव खुर्द, हिंगणी बु, म्हातोडी, कोळंबी, दापुरा, आपातापा, कौलखेड जहाँगिर, डोंगरगाव आणि म्हैसपूर ग्रामपंचायतीचा समावेश आहे.

हेही वाचा - पहिलाच प्रयोग; अकोल्यात साकारतेय चाईल्ड फ्रेंडली पोलिस ठाणे

येथे झाले मतदान
अकोला तालुक्यात सांगळूद बु., धोतर्डी, पातूर नंदापूर, गांधीग्राम, लोणाग्रा, आगर, घुसर, चिखलगाव व माझोड ग्रामपंचायतमध्ये सरपंच व उपसरंपच निवड मतदान घेवून करण्यात आली.

अकोला जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: 'काँग्रेसने महाराष्ट्रात का नाही दिला एकही मुस्लिम उमेदवार...', नसीम खान यांचा सवाल

'माझ्यासोबत राहा अन् मुलांना जन्म दे', दहशतवाद्यानं अंगठी देत केलं प्रपोज, हमासच्या कैदेतील तरुणीची आपबीती

Latest Marathi News Live Update: PM मोदींच्या सभेच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी सुट्टी देणे बंधनकारक आहे का? काय सांगतो कायदा

Maharashtra Din 2024 : वर्ल्ड फेमस आहेत महाराष्ट्रातील 'हे' खास पदार्थ, एकदा चव चाखाल तर प्रेमात पडाल.!

SCROLL FOR NEXT