Milk Production 
अकोला

Akola : दूधवाढीच्या दिवसात उत्पादनात घट!

लम्पीचा फटकाः खर्च वाढला, उत्पन्न घटले, पशुपालक अडचणीत

अनुप ताले

अकोला : उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई, पावसाळ्यात आजारांचा विळखा यामुळे पशुपालकांना उन्हाळा व पावसाळा फारसा फायदेशीर ठरत नाही. हिवाळ्यात मुबलक चारा, पाणी व आरोग्याच्या दृष्टीनेही पोषक वातावरण असल्याने जनावरांचा दूधवाढीचा काळ असतो. मात्र, यावर्षी जनावरांमध्ये लम्पी या चर्मरोगाने थैमान घातल्याने दूधवाढीच्या काळात दूध उत्पादनात घट झाल्याने पशुपालक अडचणीत सापडले आहेत.

पशुपालन किंवा दुग्ध व्यवसाय करताना मुबलक व स्वच्छ पाणी, हिरवा चारा, कोरडा चारा यांच्या उपलब्धतेचा प्रश्न भेडसावतो. मात्र, हिवाळा पशुपालन तसेच दुग्ध व्यवसायासाठी फायद्याचा मानला जातो.

पोषक वातावरण असल्याने जनावरांमध्ये हा काळ दूधवाढीचा असतो. मात्र, यंदा महाराष्ट्रासह देशभरात जनावरांवर लम्पी या रोगाने हल्ला चढविल्याने पशूंचे मृत्यू होत आहेत. बाधित जनावरांच्या दूध उत्पादनात प्रचंड घट दिसून येत आहे. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर पर्यायाने एकूण दुग्ध व्यवसायावर होत आहे.

ग्राहकांमध्ये संभ्रम

लम्पीबाधित जनावरांचे दूध आहारात घेणे योग्य की अयोग्य, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम आहे. याबाबत पशुसंवर्धन विभागाने तसेच शासनस्तरावरून जनजागृती सुरू आहे. असे दूध आहारात घेण्यासाठी कोणतीही अडचण नसून, लम्पी आजार गाय, बैलवर्गीय जनावरांमध्ये असून, तो जनावरांपासून मानवाला होत नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना IMDचा रेड अलर्ट, पुढील ४८ तास अतिवृष्टीचा धोका

Karnataka HIV student: कर्नाटकमध्ये खरंच सात हजार विद्यार्थ्यांना HIV लागण? 'एड्स प्रिव्हेंशन सोसायटी'कडून अधिकृत निवेदन जारी

Ambad Vegetable Market: अंबडच्या आठवडी बाजारात पावसाने भाजीपाल्याची मोठी नासाडी; शेतकरी‑विक्रेते बेभाव विक्रीला मजबूर

Insurance Fraud: ओम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलवर विमा घोटाळ्याची छाया? बनावट अपघात प्रकरणातून वैद्यकीय क्षेत्रातील रॅकेटचा पर्दाफाश

Ambedkar Cultural Hall: आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्ताराला स्थायी समितीची मंजुरी; २५ कोटींच्या निधीसाठी राज्य सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT