akola nandura news Narayan Maharaj Junare did not wear sandals for Ram temple for 23 years 
अकोला

अबब ! राम मंदिरासाठी त्यांनी तब्बल २३ वर्षे  घातली नाही पायात चप्पल

विरेंद्रसिंह राजपूत

नांदुरा (जि.बुलडाणा) ः अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभु रामचंद्रांचे मंदिर झाले पाहिजे म्हणून नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी येथील नारायण महाराज जुनारे यांनी सक्रिय सहभाग घेतला. सन १९८६ पासून श्रीराम मंदीर होईपर्यंत पायात चप्पल न घालण्याची केलेली आगळीवेगळी प्रतिज्ञा त्यांनी आजन्म २३ वर्षे पाळली होती 

ते आज हयात नाही. ५ ऑगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमिपूजन सोहळा होणार आहे. मंदिर निर्माणाधिन कार्याचे साक्षीदार त्यांना होता आले नसले तरी त्यांनी केलीली प्रतीज्ञा पूर्ण होत आहे.

अकोला जिल्ह्यातील बातम्यांसाठी क्लिक करा

नारायण महाराज जुनारे यांचे मुळगाव बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी. मुक्ताईनगर येथील संत आदिशक्ती मुक्ताईचे निष्काम सेवाव्रत जोपासून विणेकरी असलेले व शेवटपर्यंत मुक्ताईच्या चरणी आध्यत्मिक कार्याला वाहून देणारे नारायण महाराज जुनारे हे अयोध्या आंदोलनात १९८६ पासून सहभागी झाले होते.

तेव्हापासून त्यांनी जवळपास २३ वर्ष म्हणजे २००८ पर्यंत पायात बुट-चप्पल पादत्राणे घातली नाही. श्रीरामपंत जोशी, राजेशजी जोशी ,बापूसाहेब करंदीकर हे महाराजांच्या निस्पृहकार्याचा गौरव अनेक वेळा करायचे, सहकारी भानुदास गोंड गुरुजी, विजू कुलकर्णी, नारायणदादा कोलते व अन्य कारसेवकासह अयोध्येत कारसेवेत सुध्दा ते अग्रेसर राहिले.

कारसेवेनंतर पोलिसांनी चौकशी लावल्या त्यावेळी महाराज रावेर येथील वारकरी गोंडू बुवा यांचेकडे तीन महिने राहिले. दरमहा वारीवर भाऊसाहेब प्रल्हादराव पाटील यांची भेट व्हायची भाऊ नेहमी म्हणत‌ बुवा कीती दिवस अनवाणी फिरता ‘घाला चप्पल..’ त्या आजकाल चामड्याच्या नसतात पण‌ महाराज ठाम राहायचे. आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प.पू.मोठेबाबा नेहमी कामानिमित्त विदर्भ किंवा खान्देशात आले तर आवर्जून विचारायचे नारायण बूवा‌‌ राममंदीर वाले आहेत का? बुट घातला की नाही अजूनॽ त्यांना म्हणा की बुट‌ घाला. मोठे बाबांचा निरोप आहे; परंतु गुरूंची सुध्दा माफी मागत शेवटपर्यंत प्रतिज्ञा त्यांनी मोडली नाही.

आयुष्याचे शेवटी शेवटी प.‌पू.भास्करगिरी महाराज देवगड यांनी महाराजांचे पायांना जास्त त्रास होताना पाहीले व लाकडी खडावा पाठवून दिल्या होत्या; परंतु त्यांनी लाकडी खडाव्याकडे दुर्लक्ष करून आपले पण व प्रतिज्ञा कायम ठेवून राममंदिर होण्याकरिता २३ वर्ष अनवाणी पायातून आध्यात्मिक वसा कायम ठेवला होता.
 
मुक्ताई फडावरील स्व.नारायण महाराज जुनारे रामजन्मभुमी आंदोलनातील एक पणती होते.आता अयोध्येत राममंदिर भुमीपूजन संपन्न होत आहे या आनंदाच्या क्षणी महाराज आपल्यात नाहीत पण त्यांनी २३ वर्ष अनवाणी पायातून केलेली प्रतिज्ञा आज साक्षात साकारत असल्याचा आनंद ते हयात असते तर त्यांना झाला असता त्यापेक्षा आम्हाला होतोय.
(संपादन - विवेक मेतकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT