akola news For 103 years, the railway line of Shakuntala has been with the British 
अकोला

१०३ वर्षांपासून शकुंतला रेल्वेचा लोहमार्ग इंग्रजांकडेच; कधी तुटणार गुलामीच्या बेड्या?

राम चौधरी

वाशीम  ः देशाला इंग्रज राजवटीतून स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षांचा कालावधी उलटला आहे. अजूनही या देशात इंग्रजांचा हुकूम चालत असेल हे सांगूनही खरे वाटणार नाही. मात्र, तत्कालीन वऱ्हाड प्रातांची शान असलेली शकुंतला रेल्वे मात्र, अजूनही इंग्रजांच्याच ताब्यात आहे. कधीकाळी पांढऱ्या सोन्याची राणी म्हणून ओळख असलेला हा लोहमार्ग आता भंगारात गेला असून, या गरीबरथाचा कायापालट करण्याचे साकडे खासदार भावना गवळी यांनी रेल्वेमंत्र्यांना घातले आहे. ‘वन टाईम सेटलमेंट’ नुसार हा व्यवहार होणार असून शकुंतलेच्या पायातील गुलामीच्या बेड्या निखळण्याची आशा निर्माण झाली आहे.


विदर्भातील पांढरे सोने वाहून नेण्याकरिता ब्रिटीश शासनाने सन १९१३ साली यवतमाळ ते मूर्तिजापूर रेल्वेची निर्मिती केली होती. ‘गरीबांचा रथ’ म्हणून ओळख असलेल्या या रेल्वे गाडीला ‘शकुंतला’ नाव मिळाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाले, मात्र या रेल्वेमार्गाची मालकी इंग्लंडच्या ‘निक्सन अ‍ॅण्ड निक्सन’ कंपनीकडेच राहली. प्रचंड दुरवस्था झाल्याने ही रेल्वे बंद केली गेली.


या रेल्वेमार्गाचे मीटर गेजमधून ब्रॉडगेजमध्ये रूपांतर व्हावे याकरिता रेल्वेमंत्र्यांकडे खासदार भावना गवळी यांनी सन २००६-२००७ पासून मागणी लावून धरली होती. सततच्या पाठपुराव्यामुळे यवतमाळपासून मध्य रेल्वे मार्गावरील मूर्तिजापूरला जोडणाऱ्या ११३ किलोमीटर अंतर असलेल्या या रेल्वे मार्गाच्या गेज परिवर्तनाकरिता तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २१४७.४४ कोटी मंजूर केले होते.

सन १९१३ पासून आजही ब्रिटीशांच्या ‘निक्सन’ कंपनीची मालकी ‘शकुंतला’ रेल्वे गाडीवर असल्यामुळे अडचणी निर्माण होत गेल्या. खासदार भावना गवळी यांनी रेल्वे मंत्र्यांना व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांना वारंवार भेटून शकुंतलेची इंग्रजांची ब्रिटीश कंपनीची असलेली मालकी काढण्याकरिता पाठपुरावा केला होता.


खासदार भावना गवळी यांनी नुकतीच रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन ‘निक्सन’ कंपनीच्या मागणीचा एकत्रित तोडगा काढून शकुंतलेचा प्रश्‍न निकाली काढण्याची मागणी रेटून धरली होती. रेल्वे मंत्रालयाने यावेळी २१४७.४४ कोटी रुपयांची तरतूद केलेल्या या रेल्वे ब्रॉडगेजला कुठलीही जमीन संपादन करण्याची गरज नसल्याने ‘निक्सन’ कंपनीची मालकी या मार्गावरून काढण्यासाठी रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मकता दाखविली आहे.
(संपादन - विवेक मेतकर)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe on MPSC Paper Leak : एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! थेट 'या' ९ परीक्षांची होणार कसून चौकशी; १६ नोव्हेंबरपूर्वी पुरावे देण्याचे कडक आवाहन

Israel Election: इस्रायल निवडणुकीत कोणालाही स्पष्ट बहुमत नाही! नव्या राजकीय पेचप्रसंगाचा भारतासह इराण आणि गाझावर काय परिणाम होणार?

Pandharpur News : ऊस दरावरून पंढरपूरात वाद चिघळला; विठ्ठल कारखान्यावर आमदार अभिजीत पाटील समर्थक विरुद्ध शेतकरी संघटना आमने-सामने

IND vs NZ, 4th T20I: वैभव सूर्यवंशीला बाकावर बसवणं महागात पडलं? आधी फिलिप्सने चोपलं अन् मग गोलंदाजांनी सतावलं; भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव

India U-19 squad for Asia Cup: आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर! ज्युनियर सेहवाग, द्रविडची निवड; India vs Pakistan सामन्यात धुमाकूळ घालण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT