South Africa registered a commanding 57-run win over Canada in the T20 World Cup
esakal
T20 World Cup South Africa vs Canada Marathi Cricket News: दक्षिण आफ्रिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ड गटात कॅनडावर दणदणीत विजय मिळवला. एडन मार्करमच्या अर्धशतकी खेळीला रायन रिकेल्टन, डेव्हिड मिलर व त्रिस्तान स्तब्स यांची साथ मिळाली आणि आफ्रिकेने मोठे आव्हान उभे केले. कॅनडाच्या नवनीत धलिवालने अर्धशतक झळकावून चांगली झुंज दिली, परंतु ती अपयशी ठरली. आफ्रिकेने ५७ धावांनी सामना जिंकला आणि २.८५० नेट रन रेटसह ड गटात अव्वल स्थान पटकावले. न्यूझीलंड २ गुण व ११६२ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.