Akola News: A 14-year-old boy was hit by a vehicle while cycling
Akola News: A 14-year-old boy was hit by a vehicle while cycling 
अकोला

एका क्षणात संपले सर्वकाही, सायकलींग करताना चौदा वर्षाच्या मुलाला वाहनाने दिली धडक

अशोक रावणकर

मलकापूर (जि.बुलडाणा):  दाताळा येथील चौदा वर्षीय मुलगा तेजस नेहमीप्रमाणे पहाटे सहा वाजताच्या दरम्यान  सायकलवरून फिरायला निघाला...

मात्र, काळ दबा धरून होता...  दाताळा-ऊमाळी रस्त्यावर सायकलींग करित असताना अचानक एक वाहन आले आणि तेजसला धडक दिली अन् क्षणातच सर्वकाही संपले...


सविस्तर असे की, दाताळा बसस्थानकाच्या पाठीमागे राहणारा तेजस प्रदिप पाटील हा जेमतेम चौदा वर्षांचा मुलगा. नेहमीप्रमाणे तो सकाळी सहा वाजताच्या सुमारास सायकलवरून निघाला.

नेहमीप्रमाणेच त्याही ही सकाळ. मात्र, नियतीने डाव साधला.  दाताळा- उमाळी रस्त्यावरून सायकल चालवितांना एक अज्ञात वाहन आले आणि जोराची धडक दिली. 

तेजस हा दाताळा येथील डी.ई.एस हायस्कूल मध्ये नवव्या वर्गात शिकत होता. आई-वडील आणि दोन बहिणींच्या हसत्या खेळत्या परिवाराला नियतीची दृष्ट लागली. अन् गावभरात प्रचंड आक्रोश झाला. 

या धडकीत चौदा वर्षांचा कोवळा तेजस काळाने हिरावून नेला. या अपघाताची माहिती  विलास खर्चे यांना मिळताच त्यांनी ग्रामीण पो‌स्टेला फोनकरून सांगितले.

पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापुर उपजिल्हा रुग्णालयात हलविला. 

उपजिल्हा रुग्णालयात नगराध्यक्ष अॅड हरीश रावळ,अॅड.साहेबराव मोरे ,जि.प.सदस्य संतोष रायपुरे, मनसे (परीवहन) जिल्हाध्यक्ष गजानन ठोसर,भाराकाॅ तालुकाध्यक्ष बंडुभाऊ चौधरी, पत्रकार प्रशांत उंबरकर आदिंनी धाव घेतली. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक बेहराणी यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सचिन दासर,पो.हे.काॅ चंदु गायकवाड करीत आहे.

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024: नगरमध्ये PM मोदींनी लालूंवर सोडले टीकास्त्र! मुस्लिम आरक्षणावरून सुरू झाला वाद, काय म्हणाले?

Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

Mother's Day 2024: 'मदर्स डे' निमित्त आईसोबत करा दक्षिण भारतातील 'या' सुंदर ठिकाणांची भटकंती

Latest Marathi News Live Update: इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट जवळ आली - नरेंद्र मोदी

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : कोल्हापूर-हातकणंगलेमध्ये मतदानावरुन वाद

SCROLL FOR NEXT