Akola News: 27 new corona patients tested positive, bringing the total number of infected to 9,458
Akola News: 27 new corona patients tested positive, bringing the total number of infected to 9,458 
अकोला

कोरोनाचे नवे २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल, एकूण बाधितांची संख्या झाली ९ हजार ४५८

सकाळ वृत्तसेेवा

अकोला  : कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) २७ नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची एकूण संख्या ९ हजार ४५८ झाली असून मृतकांची संख्या २९३ झाली आहे.

कोरोना संसर्ग तपासणीचे मंगळवारी (ता. १) १५२ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २७ अहवाल पॉझिटिव्ह तर १२५ अहवाल निगेटिव्ह आले. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये १२ महिला व १५ पुरुषांचा समावेश आहे.

संबंधित रुग्ण लाखपुरी ता. मूर्तिजापूर येथील तीन, मलकापूर व माधवनगर येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, शास्त्री नगर, जेतवन नगर, गायत्रीनगर, सांगवी खु, शिवाजी नगर, खोलेश्वर, पातूर, खडकी, दुर्गा चौक, राऊतवाडी, बालाजी प्लॉट, शेलाड ता. बाळापूर, गणेशनगर, मुखर्जी बंगला, आकाशवाणी मागे, आळशी प्लॉट, जठारपेठ व तुकाराम चौक येथील प्रत्येकी एक जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान ३० नोव्हेंबर रोजी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टच्या प्राप्त अहवालात १५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांचाही समावेश एकूण पॉझिटिव्ह व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

११९ जणांना डिस्चार्ज
कोरोनावर मात करणाऱ्या १७ जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून, आयकॉन हॉस्पिटल मधून दोन आणि अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून तीन व होम आयसोलेशन मध्ये असणाऱ्या ९७ अशा एकूण ११९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.


आता सद्यस्थिती
- एकूण पॉझिटिव्ह - ९४५८
- मृत - २९३
- डिस्चार्ज - ८६००
- ॲक्टिव्ह रुग्ण - ५६५

(संपादन - विवेक मेतकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT