अकोला ः इयत्ता दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेला शुक्रवार (ता. २०) पासून सुरूवात होणार आहे. पुरवणी परीक्षांसाठी जिल्ह्यात आठ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात बारावीचे ६७२ तर इयत्ता दहावीचे ५१८ विद्यार्थी या परीक्षेस बसले आहेत. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी एक तास आधी परीक्षा केंद्रावर उपस्थित रहावे. तेथे त्यांची थर्मल गन व पल्स ऑक्सिमिटरच्या सहाय्याने चाचणी करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत. (संपादन - विवेक मेतकर) | |||
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.